Home /News /mumbai /

पोलीसदादांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले महत्त्वाचे पाऊल, प्रशासनाला दिले निर्देश

पोलीसदादांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले महत्त्वाचे पाऊल, प्रशासनाला दिले निर्देश

पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादरीकरण करण्यात आले

    मुंबई, 30 डिसेंबर : सण, उत्सव असो अथवा अस्मानी किंव कोरोनाचे संकट राज्यातील पोलीस (Maharashtra Police) आपल्या जीवाची बाजी लावून अहोरात्र कर्तव्य पार पाडत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांना हक्काचे छत मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी पुढाकार घेतला आहे. 'पोलिसांसाठी जास्तीत जास्त  निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करा, अशी महत्त्वाची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी  महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस गृह मंत्री अनिल देशमुख, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. सलमान खाननं चुलीवर बनवलं जेवण, खमंग लसणीचा झणझणीत तडका दिल्याचा पाहा Video या बैठकीत पोलिसांना निवासस्थान बांधून देणाऱ्या खासगी विकासकांना सवलत देणे, पुनर्विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पातील रहिवासी क्षेत्राच्या आरक्षणात सवलत देऊन निवासस्थानाची उपलब्ध करून घेणे, राज्यातील गृह विभागाच्या जागांचा पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून विकास करणे आणि त्यासाठी महामंडळाला बीज भांडवल उपलब्ध करून देणे अशा विविध पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. म्हाडाच्या भुखंडावरील निवासस्थान इमारतींचा पुनर्विकास याबाबतही चर्चा झाली. 'सेवेच्या ठिकाणी चांगले निवासस्थान उपलब्ध झाल्यास पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करू शकणार आहेत. त्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून, जास्तीत जास्त संख्येने आणि सुविधांनी युक्त निवासस्थाने बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंकष असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिले आहे. 'आई वडिलांना मारलं, आता दफन करु द्या,' मुलाची पोलिसांना विनंती - Video 'स्वातंत्र्यपूर्व काळात पोलिसांसाठी जितकी निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातुलनेत स्वातंत्र्यानंतरही तितकी निवासस्थाने उपलब्ध करून देता आली नाहीत. त्यामुळे पोलीस मनुष्यबळाच्या तुलनेत निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे' असं गृहमंत्री देशमुख म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या