मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं स्मारक उभारा मुंबईत उभारा, भाजपची सेनेकडे मागणी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं स्मारक उभारा मुंबईत उभारा, भाजपची सेनेकडे मागणी

शिवशाहीर पुरंदरे यांच मुंबईसारख्या महानगरात स्मारक व्हावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे.

शिवशाहीर पुरंदरे यांच मुंबईसारख्या महानगरात स्मारक व्हावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे.

शिवशाहीर पुरंदरे यांच मुंबईसारख्या महानगरात स्मारक व्हावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे.

मुंबई, 21 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांचा जाज्वल्य असा इतिहास त्यांचे स्फूर्ती देणारे शौर्य आणि त्यांनी घडवलेले स्वराज्याबद्दल लिखाण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ( Shivshahir Babasaheb Purandare) यांनी केलं. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांचे एक भव्य स्मारक केले पाहिजे अशी मागणी भाजपचे (bjp) मुंबईचे गटनेते प्रभाकर शिंदे (prabhakar shinde) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून केली आहे.

प्रभाकर शिंदे यांनी या पत्रात शिवाजी पार्क जवळच्या संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र दालनाच्या पहिल्या मजल्यावर हे स्मारक उभे केले जावे, अशी मागणी केली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले विपुल लेखन साहित्य आणि इतिहास संशोधन याची माहिती द्यावी, पुढच्या पिढीला बाबासाहेबांचे कार्य हे प्रेरणा देण्यासाठी आवश्यक आहे. पुढच्या पिढीला या स्मारकातून ही प्रेरणा मिळेल. तेव्हा मुंबई महानगरपालिकेने बाबासाहेब पुरंदरे यांचे हे कलादालन ये खऱ्याअर्थाने बाबासाहेब पुरंदरे यांचे स्मारक ठरेल अशी भूमिका मांडली आहे.

कामाची पाहणी करत असताना 8 व्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू,भिवंडीतील घटना

15 नोव्हेंबरला बाबासाहेब यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र हरवायला बाबासाहेबांचे निघून जाणे हे संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. दादर येथील शिवाजी पार्क परिसराला मुंबई महानगरपालिकेचे संयुक्त महाराष्ट्र दालन ही वास्तू आहे.

Shocking Eviction : बिग बॉस मराठीच्या घरातील सारंगे गर्ल स्नेहा वाघ आऊट

या वास्तूत मुंबईसह महाराष्ट्र एक राहावा यासाठी 106 हुतात्म्यांना प्राणआहुती दिली होती. त्याबद्दलची माहिती चित्र इतिहास सांगणारे अनेक गोष्टी आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांचे असेच जीवनपट उलगडणारे चित्र साहित्य असणारे दालन उभे केले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शिवसेना पक्ष कायमच छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा असल्याचे सांगत आला आहे. पण बाबासाहेबांच्या स्मारकाच्या मागणीच्या बाबतीत मात्र भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. त्यामुळे भाजपची मागणी मान्य होईल का हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

First published: