News18 Lokmat

डोंबिवली स्टेशनजवळ इमारतीला आग

एसीच्या शॉर्ट सर्कीटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे. दुपारी 12-12.30 च्या दरम्यान ही आग लागली असल्याचं लक्षात आलं होतं

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2017 03:35 PM IST

डोंबिवली स्टेशनजवळ इमारतीला आग

 26 ऑगस्ट: डोंबिवली स्टेशन रोडवरील इमारतील आज दुपारी आग लागली आहे. आग लागलेल्या या इमारतीचं नाव विरा शॉपिंग सेंटर आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे.

एसीच्या शॉर्ट सर्कीटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे. दुपारी 12-12.30 च्या दरम्यान ही आग लागली असल्याचं लक्षात आलं होतं. दरम्यान घटनास्थळी 6 फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विजवण्यासाठी अंबरनाथहूनही एक फायर ब्रिगेड निघाली आहे. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. जिथं आग लागली तो परिसर चिंचोळा आहे. कपड्याच्या गोदामाला लागलेली आग पसरण्याची भीती आहे.

दरम्यान अग्निशमनदलही घटनास्थळी दाखल झालं असून आग विजवण्याचे प्रयत्न चालू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2017 03:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...