Home /News /mumbai /

सचिन वाझे यांची तात्काळ बदली होणार, गृहमंत्र्यांची घोषणा

सचिन वाझे यांची तात्काळ बदली होणार, गृहमंत्र्यांची घोषणा

'या प्रकरणाचा तपास हा एटीएसकडे दिला आहे. या प्रकरणात जो दोषी आढळतील, त्यावर कडक कारवाई केली जाईल'

    मुंबई, 10 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren death case) प्रकरणावरून अधिवेशनात (Maharashtra Budget 2021)  भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेत पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin waze) यांच्या निलंबनाची मागणी केली होती. अखेर महाविकास आघाडी सरकारने (MVA Goverment) एक पाऊल मागे घेतले आहे.  सचिन वाझे यांची तात्काळ बदली करण्यात येणार अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याच्या कायद्या सुव्यवस्थेच्या मुद्यावर निवेदन सादर केलं. पण, भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सचिन वाझे यावर काय भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी लावून धरली. भाजपच्या आमदारांनी एकच गोंधळ घातला. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नवे वळण, धक्कादायक माहिती आली समोर अखेर,  सचिन वाझे हे क्राईम ब्रांन्चमध्ये सध्या कार्यरत आहे. त्यांना त्या पदावरून हटवले जाईल. अशी मागणी विरोधकांनी केली होती ती मान्य केली आहे. सचिन वाझे यांची क्राईम ब्रांच युनिटमधून बदली केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्र्यांनी केली. तसंच, 'एटीएएस चांगला तपास करत आहे. जे दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार, सचिन वाझेंना क्राईम ब्रांचमधून हलवले आहे. तसंच मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे', अशी माहितीही देशमुख यांनी दिली. पोलीस कर्मचाऱ्याचा सासुरवाडीत अंधाधुंद गोळीबार, पत्नी आणि सासू-सासऱ्यांची हत्या परंतु, तरीही भाजप आमदारांनी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात यावे आणि अटक करण्यात यावी अशी मागणी लावून धरत जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या