पळून जाऊन लग्न करणाऱ्या बहिण आणि पतीवर भावाने केला गोळीबार, नंतर...

पळून जाऊन लग्न करणाऱ्या बहिण आणि पतीवर भावाने केला गोळीबार, नंतर...

मुंबईत आल्यावर कांदिवलीतील समतानगरमध्ये घरं घेऊन या जोडप्याने आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली.

  • Share this:

सत्यम सिंग, प्रतिनिधी

कांदिवली, 16 डिसेंबर : खोट्या प्रतिष्ठेसाठी सैराट चित्रपटामध्ये आर्ची आणि परश्याची भावाने खून केल्याचं दाखवण्यात आलं होतं. अशीच एक घटना सुदैवाने कांदिवली परिसरात घडता घडत राहिली. बहिणीने पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून भावाने बहिणी आणि तिच्या पतीवर गोळीबार केला. या घटनेनंतर भावाने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.

बटुकेश्वर त्रैलोकीनाथ तिवारी(३४) असे या भावाचे नाव आहे. बहिणीने सहा महिन्यांपूर्वी रोहित सिंग नावाच्या  तरुणासोबत पळून जाऊन उत्तर प्रदेशमध्ये लग्न केलं होतं. तिवारी कुटुंब हे मुळचं उत्तर प्रदेशमध्ये राहणारं आहे. इतर जातीच्या तरुणासोबत लग्न केल्यामुळे तिवारी कुटुंबाचा संतापाचा उद्रेक झाला होता.

उत्तर प्रदेशमध्ये लग्न केल्यानंतर तिथून पळून बहिणी आणि तिच्या साथीदाराने मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर  कांदिवलीतील  पश्चिम द्रुतगती हायवेला लागून गाव देवी मंदिरजवळ असलेल्या समतानगरमध्ये घरं घेऊन या जोडप्याने आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली.

आपली बहिणी ही मुंबईत राहते हे कळल्यावर भाऊ बातेश्वर तिवारी तिच्या घरी पोहोचला. आज साडे आठ वाजताच्या दरम्यान बातेश्वर बहिणीच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने बहिणीवर आणि तिच्या पतीवर गोळीबार केला.  परंतु, त्याची बहीण आणि पती घराबाहेर पळल्यानं वाचलं. त्यानंतर बटुकेश्वर याने  स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली .

अचानक झालेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रात्री उशिरापर्यंत त्याच्या बहिणीचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. युपीच्या चंदवलीमधील बटुकेश्वर रहिवासी होता. त्याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनसाठी शताब्दी रुग्णलयात पाठवला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

First Published: Dec 16, 2019 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading