VIDEO :'चाॅकलेट आणते म्हणून 'ती' माझ्या भावाला घेऊन निघाली'

VIDEO :'चाॅकलेट आणते म्हणून 'ती' माझ्या भावाला घेऊन निघाली'

बुरखाधारी महिलेला टोकले आणि तू कोण? माझ्या भावाला कुठे घेऊन चाललीस? असे प्रश्न हमजा त्या बुरखाधारी महिलेला विचारु लागला.

  • Share this:

अजित मांढरे,प्रतिनिधी

12 नोव्हेंबर : पोलीस नेहमी सांगतात गुड टच बॅड टच आणि कोणी आपल्याला काय वस्तू देऊ केली तर काय करायचे? याचं उत्तम उदाहरण समोर आलंय ते ठाण्यातील मुंब्रा भागात.

१० वर्षांचा हमजा सिद्दिकी हा त्याच्या अडीच वर्षांचा भाऊ फरहान सोबत शुक्रवारी दुपारी घराच्या बाहेर खेळत होता. मुंब्रा मधील झरीना अपार्टमेंटमध्ये हे दोघे भाऊ राहतात. शुक्रवारी अचानक दुपारी दीडच्या सुमारास एक बुरखाधारी महिला आली आणि तिनं हमजाचा भाऊ फरहानशी गप्पा मारू लागली आणि अचानक ती फरहानला घेऊन निघाली यावेळी हमजाने त्या बुरखाधारी महिलेला टोकले आणि तू कोण? माझ्या भावाला कुठे घेऊन चाललीस? असे प्रश्न हमजा त्या महिलेला विचारु लागला. तुला आणि तुझ्या भावाला चाॅकलेट आणायला चाललीये मी असं त्या बुरखाधारी महिलेने हमजाला सांगताच हमजाने त्या महिलेला विरोध करायला सुरुवात केला आणि त्या महिलेचा पाठलाग करत तब्बल ८ मिनिटे पाठलाग करुन हमजाने आरडा-ओरडा करुन लोकांना गोळा करायला सुरुवात केली.

तेव्हा ती महिला फरहानला सोडून पळाली. हमजा त्या महिलेचा पाठलाग करतोय हे जवळच्याच एका दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय.

हमजाने जर हुशारी आणि साहस दाखवलं नसतं तर आज त्याच्या भावाचे अपहरण झाले असते. पण हमजामुळे त्याच्या भावाचा जीव वाचल्याने मुंब्रामध्ये तसंच त्याच्या नातेवाईकांकडून हमजावर कौतुकांचा वर्षाव केला जातोय. हमजा सारखे साहस आणि सतर्कता जर सर्वां मुलांनी दाखवली तर नक्कीच अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल.

===============

First published: November 12, 2018, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading