नराधम भाऊ, 5 वर्षाच्या बहिणीवर इमारतीच्या जिन्याखाली केला बलात्कार

नराधम भाऊ, 5 वर्षाच्या बहिणीवर इमारतीच्या जिन्याखाली केला बलात्कार

मामाच्या पाच वर्षीय मुलीला तुला काही तरी सांगायचे आहे अशी बतावणी करून तिला बिल्डिंगच्या जिन्याखाली नेलं. त्यानंतर आतेभावाने तिच्या बलात्कार केला.

  • Share this:

भिवंडी, 20 मे : 5 वर्षाच्या मुलीवर तिच्या आतेभावाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी तालुक्यातील वळपाडा इथं समोर आला आहे. महाराष्ट्रात मुलींवर बलात्कार करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. बलात्काराच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मामाच्या पाच वर्षीय मुलीला तुला काही तरी सांगायचे आहे अशी बतावणी करून तिला बिल्डिंगच्या जिन्याखाली नेलं. त्यानंतर आतेभावाने तिच्या बलात्कार केला. या सगळ्या प्रकारानंतर आरोपीने मुलीला कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. पण त्यानंतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या बलात्कार प्रकरणी दोघांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा  गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी फरार झाला आहे.

हेही वाचा : रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

बलात्कारानंतर मुलीला वेदना सुरू झाल्या. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या घरच्यांनी आरोपी मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर पीडित चिमुकलीवर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली असून आरोपी मुलाच्या आईची या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पोलीस फरार आरोपीचाही शोध घेत आहे. एका अल्पवयीन मुलाने असे कृत्य केल्यामुळे आताची तरुणीई धोक्याच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपली मुल कोणत्या वातावरणात राहत आहे याची काळजी प्रत्येक पालकांनी घेणं महत्त्वाचं आहे.

SPECIAL REPORT : महाराष्ट्रातील एक्झिट पोल काय सांगतोय, 'परिवर्तन' नेमकं कुणाचं होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2019 11:10 PM IST

ताज्या बातम्या