मुंबई, 23 ऑगस्ट : भारताचा मोस्ट वॉन्टेड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच राहत असल्याचं संयुक्त राष्ट्राने जाहीर केल्यामुळे पाकिस्तानाची पोलखोल झाली आहे. दाऊद हा पाकमध्येच लपून बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नवी मागणी केली आहे.
दाऊद हा पाकिस्तानात असल्याचे आता शिक्तामोर्तब झाल्यानंतर त्याला भारतात परत आण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे.
'दाऊद इब्राहिम हा आता पाकिस्तानात असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणाच' अशी मागणी रोहित पवारांनी थेट थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. रोहित पवार यांच्या या मागणीमुळे आता राजकीय चर्चा रंगू लागल्या आहे.
Now that Pakistan has accepted Dawood Ibrahim is indeed in Karachi, I would request Hon'ble PM @narendramodi ji to do everything possible for bringing him to justice.
Let's get him on Indian Soil at any cost.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 23, 2020
दाऊद हा कराचीमध्ये राहात असून त्याच्या 88 दहशतवादी आणि संघटनांची यादी जाहीर केली त्यात दाऊदचं नाव असून त्याचा पत्ता हा कराची व्हाईट हाऊस असल्याच्या भारताच्या दाव्याला पाककडून शनिवारी दुजोरा देण्यात आला.
सराईत गुन्हेगार मित्र द्यायचा त्रास, ओंकारने घरामागेच खोदला खड्डा अन्....
पण, दाऊद इब्राहिम कराचीमध्ये नसल्याची माहिती आता पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाकडून देण्यात आली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दाऊद इब्राहिमच्या उपस्थितीचा पुन्हा खंडन करत यासंदर्भात एक निवेदन जारी केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निवेदनात म्हटलं आहे की, 'दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा खोटा आहे. दाऊद पाकिस्तानमध्ये नाही.'
दहशतवादांना मदत करणाऱ्या देशांवर FATF ही आंतरराष्ट्रीय संघटना लक्ष ठेवत असते. त्या संघटनेने पाकिस्तानला ग्रे यादीत टाकलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पत खालावली होती. जागतिक वित्तीय संस्था मदतही करत नव्हत्या. त्यामुळे त्या यादीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला ही कृती करावी लागली. या आधी भारताने अनेकदा पुरावे देऊन दाऊद हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचं सांगितलं होतं.