• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुंबई रंगणार 24 रंगात, दादरला भगवा तर माहिमला हिरवा रंग

मुंबई रंगणार 24 रंगात, दादरला भगवा तर माहिमला हिरवा रंग

Mumbai: Bolts of lightning flash across the sky during thunderstorm and rain over the suburbs, in Mumbai, late Monday, June 10, 2019. (PTI Photo/Neel Geelani) (PTI6_11_2019_000037B)

Mumbai: Bolts of lightning flash across the sky during thunderstorm and rain over the suburbs, in Mumbai, late Monday, June 10, 2019. (PTI Photo/Neel Geelani) (PTI6_11_2019_000037B)

मुंबईतील प्रत्येक वॉर्डाला मिळणार एक युनिक रंगाची ओळख, फूटपाथ, भिंती, दुभाजक रंगणार एकाच रंगात

  • Share this:
मुंबई 13 फेब्रुवारी : मुंबईत प्रत्येक प्रभागाला एक विशिष्ट रंग देण्याचा पालिका विचार करतेय. त्यामुळे उद्या दादर चे फूटपाथ  भगवे किंवा माहीम मध्ये हिरव्या रंगाचे बोर्ड दिसले तर नवल वाटून घेऊ नका. सध्या तरी कुठल्या प्रभागाला कुठला रंग दिला जाईल हे ठरवलं गेलं नसून त्यावर विचार केला जात आहे. या प्रस्तावानुसार मुंबईतल्या 24 प्रभागांपैकी पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई शहरात येणाऱ्या 15  प्रभागाना हे विशिष्ट रंग दिले जाणार आहेत. फूटपाथ, फुटपाथच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी जाळ्या, रस्ते दुभाजक, भिंती, दिशादर्शक फलक अशा सगळ्या ठिकाणी एकच रंग लावला जाईल. पण हे रंग कोणते लावावे याबाबत मात्र अजूनही निर्णय घेतला गेला नाहीये. सध्या तरी त्याबाबत वॉर्ड ऑफिसरना किती खर्च येईल याबाबत  अंदाजपत्रक तयार करायला सांगितलं गेलं आहे. हे अंदाज पत्रक तयार झाल्यावर मुंबई शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला जाईल. कारण हा सगळा खर्चाचा भार जिल्हाधिकारी उचलणार आहेत. त्यानंतर वॉर्ड ऑफिसर, नगरसेवक यांच्या एकत्रीत संमतीने कोणत्या रंगात कोणता वॉर्ड न्हाऊन निघेल हे ठरवलं जाणार आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधानंतरही बसच्या तिकीटदरात होणार मोठी वाढ? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा अशाप्रकारे कोलकाता शहराला निळ्या रंगात रंगावण्याचं काम केलंय. पण एकच रंग.  इथे मात्र मुंबईला 24 रंगात रंगावण्याचं पालिकेने मनावर घेतलंय. मुंबईच्या जीवनात नानाविध कळा असल्याचं बोललं जातं. आता प्रत्यक्ष विविध रंगात मुंबई न्हाऊन निघणार आहे. मुंबईसारख्या शहरात अजूनही स्वछता नीट होत नाहीये. पालिकेच्या मुख्यालयाबाहेरच्या फूटपाथवर असंख्य गाड्या पार्क करून ठेवल्या जातात, अनेक फूटपाथ फेरीवाल्यांनी काबीज केलेत, अंतर्गत रस्त्यावर गाडी चालेल की नाही अशी स्थिती आहे. दिल्लीनंतर 'आप'ली डोंबिवली? आम आदमी पार्टीची बॅनरबाजी मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर बेकायदेशीर गाड्या उभ्या आहेत ज्या ट्रॅफिक जॅम करतायत. उघड्या गटारांची घाण झोपडपट्टीतील राहिवाशाच जिणं नकोस करतेय. त्यामुळे 24 वॉर्डना 24 रंगानी रंगवून मुंबईची भेळपुरी करण्यात पालिकेला नेमकं काय साधायचा आहे असा प्रश्न आता विचारला जातोय.
Published by:Ajay Kautikwar
First published: