मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /भरलग्नात नवरदेवाच्या पायाची पुजा करण्यावरुन वाद, मुंबईतील वधूमुलीचा मोठा निर्णय

भरलग्नात नवरदेवाच्या पायाची पुजा करण्यावरुन वाद, मुंबईतील वधूमुलीचा मोठा निर्णय

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका लग्न समारंभात एक वेगळीच घटना समोर आली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Unnao, India

उन्नाव, 8 फेब्रुवारी : लग्नामध्ये प्रत्येक जातीधर्मात वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. अनेक जण त्या परंपरा पाळतात. तर काही जणांचा काही परंपरांना नकारही असतो. अशावेळी दोन्ही पक्ष समजूतीने निर्ण घेतात. मात्र, एका लग्न समारंभात एक वेगळीच घटना समोर आली आहे. या घटनेत एका परंपरेवरुन मुलीने थेट लग्नाला नकार दिला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

यूपीच्या उन्नाव जिल्ह्यात लग्नाची वरात आली आणि स्वागतानंतर पायांची पूजा करण्याचा विधी पूर्ण करण्याची वेळ आली. मात्र, वधूच्या वडिलांनी आधी ठरल्याप्रमाणे चरणपूजनाचा विधी न करण्याची आठवण करून देत नकार दिला. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. इतकेच नाही तर प्रकरण हाणामारीवर पोहोचले. त्यानंतर तरुणीने लग्नास नकार दिला.

उन्नाव येथील कॉलेज रोडवरील एका गेस्ट हाऊसमध्ये सोमवारी रात्री लग्नसमारंभात पायाची पूजा करण्याच्या विधीवरून वधू आणि वरपक्षामध्ये वाद झाला. यानंतर याठिकाणी हाणामारीचीही घटना घडली. यानंतर मात्र, वडील आणि घरच्यांचा अपमान झाल्यामुळे संतापलेल्या तरुणीने लग्नास नकार दिला. दरम्यान, गेस्ट हाऊस मालकाच्या माहितीवरून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्या. मात्र, दोन्ही पक्षांनी माघार न घेतल्यानं एकमेकांचे सामान परत करण्यात आले. यानंतर हे प्रकरण शांत झाले.

उन्नाव शहरातील एका मोहल्ल्यातील तरुणीचे लग्न शुक्लागंज येथे राहणाऱ्या नातेवाईकाच्या मुलासोबत ठरले होते. सोमवारी ही वरात ठरलेल्या वेळी पोहोचली. स्वागतानंतर वराचे पाय पूजन करण्याचा विधीच्या वेळी वधूच्या वडिलांनी आधी ठरल्याप्रमाणे पाय पूजनाचा विधी करू नये, अशी आठवण करून दिली. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद होऊन प्रकरण हाणामारीवर पोहोचले. यानंतर वडिलांच्या अपमानामुळे संतापलेल्या मुलीने लग्नास नकार दिला. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडाली.

हेही वाचा - चुलत भावांमधील वाद विकोपाला, रत्नागिरीमध्ये एकासोबत घडलं भयानक

पोलिसांनी प्रथम दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही पक्ष ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे एकमेकांच्या वस्तू परत करुन आणि खर्चाचे व्यवहार करून प्रकरण मिटवण्यात आले. क्राइम इन्स्पेक्टर सुशील कुमार यादव यांनी सांगितले की, वाद वाढल्याने लग्न होऊ शकले नाही. दोन्ही बाजूंनी कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला.

हळदी समारंभाच्या दिवसापासूनच वाद सुरू -

वधूच्या भावाने सांगितले की, दोन्ही कुटुंबे नातेवाईक आहेत आणि मुंबईतील सांताक्रूझ येथे जवळपास राहतात. युवतीच्या भावाने सांगितले की, हळदी समारंभाच्या दिवशीच वाद सुरू झाला. हळदीच्या दिवशी वरमुलाकडच्या लोकांनी आणखी अनेक मागण्या केल्या होत्या. वरमुलगी व्हिसा पासपोर्ट बनवणाऱ्या कंपनीत वरिष्ठ सहाय्यक तर वरमुलगा प्रॉपर्टी डीलर आहे, असे सांगितले जात आहे.

First published:

Tags: Bride, Bridegroom, Local18, Marriage, Mumbai, Uttar pradesh news