Home /News /mumbai /

प्रेमासाठी काहीही! लग्नात नवरदेव अन् नवरी दोघांनीही घातलं एकमेकांना मंगळसूत्र, सांगितलं कारण

प्रेमासाठी काहीही! लग्नात नवरदेव अन् नवरी दोघांनीही घातलं एकमेकांना मंगळसूत्र, सांगितलं कारण

मुंबईत एका वधू-वरांनी स्वतःच्या लग्नात एकमेकांना मंगळसूत्र घातले. जुन्या रिवाजाला नवे रूप देणाऱ्या शार्दूल आणि तनुजा या जोडप्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या कृतीने अनेकांना धक्का बसला आहे आणि या जोडप्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात येत आहे. तर, काही जणांनी या बदलाचे स्वागतही केले आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 08 मे : भारतीय हिंदू रिवाजानुसार केल्या जाणाऱ्या लग्नांमध्ये नवरदेवाने वधूला मंगळसूत्र घालणे ही बाब सर्वपरिचित आहे. मात्र, मुंबईत एका वधू-वरांनी स्वतःच्या लग्नात एकमेकांना मंगळसूत्र घालून हा विधी पार पाडला. जुन्या रिवाजाला नवे रूप देणाऱ्या शार्दूल आणि तनुजा या जोडप्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या कृतीने अनेकांना धक्का बसला आहे आणि या जोडप्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात येत आहे. तर, काही जणांनी या बदलाचे स्वागतही केले आहे. जेव्हा शार्दुल कदमने लग्नाच्या दिवशी आपणही मंगळसूत्र घालू, असे सांगितले, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. अनेकांची नाराजीही उमटली. तथापि, लोकांची पर्वा न करता, शार्दुलने लग्नाच्या दिवशी मंडपातील आपल्या नवविवाहीत वधूला मंगळसूत्र घातल्यानंतर वधूनेही त्याला मंगळसूत्र घातले. शार्दुलने 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' यांना असे करण्यामागील कारण सविस्तरपणे सांगितले आहे. तसेच, लग्नाच्या दिवशी तनुजाने आणि मी एकमेकांच्या गळ्यात मंगळसूत्र घातले, तेव्हा मला खूप आनंद झाला होता, असे तो म्हणाला. शार्दुल आणि तनुजा एकमेकांना कॉलेजमध्ये भेटले. पण त्यांची प्रेमकथा पदवीनंतर चार वर्षांनंतर सुरू झाली. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत शार्दुलने आपल्या प्रेमकथेविषयी सांगितले. आम्ही एकमेकांशी अनपेक्षितपणे संपर्क साधला, असे तो म्हणाला. तनुजा हिमेश रेशमियाची गाणी इंस्टाग्रामवर शेअर करायची आणि कॅप्शनमध्ये लिहायची - टॉर्चर. मी याला उत्तर द्यायचो - महाटॉर्चर. अशाप्रकारे आमचे संभाषण सुरू झाले.
  हे वाचा - नवराच नाही तर सासऱ्याच्या पायाखालचीही सरकली जमीन, नव्या नवरीचं कृत्य वाचून व्हाल हैराण काही काळानंतर दोघांची भेट झाली तेव्हा त्यांनी फेमिनिझमविषयी चर्चा केली. शार्दुल स्वतःला हार्डकोअर फेमिनिस्ट म्हणवतो. आई-वडिलांना आपल्या नात्याविषयी सांगण्यापूर्वी हे दोघे वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते. 2020 सप्टेंबरपासून त्यांनी लग्नाचा विचार सुरू केला. शार्दुल म्हणतो, 'मी तनुजाला सांगितले की, फक्त मुलीनेच मंगळसूत्र का घालावे? याला काही अर्थ आहे? आम्ही दोघेही समान आहोत. म्हणून मीही माझ्या लग्नाच्या दिवशी मंगळसूत्र घालेन.'  तथापि, शार्दूलच्या या निर्णयामुळे त्याचे पालक आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु, शार्दुलने त्यांचे न ऐकता ठरवल्याप्रमाणे केले. एकत्र मंगळसूत्र परिधान केल्याने समानता दिसून येते, असे तो म्हणतो. हे वाचा - अरे बापरे! शार्कने बोटच जबड्यात धरली आणि…; पुढे काय झालं पाहा VIDEO इतकेच नाही तर, शार्दुलने तनुजाच्या घरातील सदस्यांची भेट घेतली आणि लग्नाचा खर्च दोन्ही परिवारांमध्ये अर्धा-अर्धा वाटण्याचे ठरविले. मग लग्नाच्या एक दिवस आधी, तनुजाने शार्दुलला विचारले की लग्नानंतरही आपण मंगळसूत्र घालणार काय? त्यावर, शार्दुलने होकार दिला. त्यांचे लग्न चांगल्याप्रकारे पार पडले. परंतु, लग्नातले काही पुरुष अतिथी नाराज झाले. पण त्यांना काही बोलता आले नाही. मात्र, ही बाब सोशल मीडियावर येताच लोकांनी टोमणे मारण्यास सुरुवात केली. जेव्हा या जोडप्याचा हा 'मंगळसूत्र सोहळा' फोटोसह प्रकाशित झाला, तेव्हा ‘आता साडी नेसा,’ असे टोमणे मारण्यास लोकांनी सुरुवात केली, असे शार्दुल म्हणाला. मात्र, इन्स्टाग्रामवर त्याच्या बऱ्याच फॉलोअर्सना हा निर्णय आवडला आणि त्यांनी त्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन दर्शविला. इंस्टाग्रामवर शार्दुलच्या पोस्टला 89,000 हून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Marriage, Mumbai, Mumbai News

  पुढील बातम्या