आंब्याच्या पेटीतून 12 लाख घेताना IAS अधिकाऱ्याला रंगेहात अटक

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2017 06:02 PM IST

आंब्याच्या पेटीतून 12 लाख घेताना IAS अधिकाऱ्याला रंगेहात अटक

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई  :

आदिवासी विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना 12 लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केली. ठाणेचे अप्पर आयुक्त मिलिंद गवादे आणि सहाय्यक मिलिंद माळी असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्या जवळ 12 लाख व्यक्तिरिक्त आणखी 11 लाख रुपये सापडल्यानं या दोघांकडे मोठ घबाड असल्याचा एसीबीचा कयास आहे.

आदिवासी विभागाचं ठाणे अप्पर आयुक्तांच हे कार्यालय. याच कार्यालयात अप्पर आयुक्त मिलिंद गवादे आणि त्याचा सहाय्यक मिलिंद माळी यांना तब्बल 12 लाख रुपयांची लाच घेताना एसीबी ने रंगेहात अटक केलीय. विभागातील विविध आश्रमशाळेतील गृहपाल पदीवर काम करणाऱ्या 12 जणांना त्याच पदावर काम करण्यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची लाच मिलिंद गवादे यांनी मागितल्याची तक्रार या बारा जणांपैकी एकानं एसीबीकडे केली. ही रक्कम आंब्याच्या पेटीतून देताना एसीबीनं गवादे आणि माळीला रंगेहात पकडलय. पाहूयात काही तपशील..

काय आहे प्रकरण ?

- गृहापालपदी पदोन्नती कायम करण्यासाठी 12 जणांकडून प्रत्येकी 1 लाखाची लाच

Loading...

- आंब्याच्या पेटीतून 12 लाख घेताना रंगेहात अटक

- अप्पर आयुक्त मिलिंद गवादे आणि त्याचा सहाय्यक माळीला अटक

- माळीच्या बॅगमध्ये आणखी 11 लाख सापडले

- दोघांना 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

- एसीबीचे एसपी संग्राम निशानदार आणि डिवायएसपी अजय आफळेंची कारवाई

थेट आयएएस दर्जाचा अधिकारी जाळ्यात सापडल्याची ही गेल्या काही वर्षातली पहिली घटना आहे.  आश्रमशाळांच्या दुरावस्था आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आदिवासी विभाग कायम चर्चेत राहिलंय. आता तर अशा घटनांमुळे यावर आदिवासी विभागाची लक्तर वेशी वर टांगली गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2017 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...