मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : राणेंची रात्रीतून सुटका होणार, प्रकरण वाढवायचं की मिटवायचे याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती?

BREAKING : राणेंची रात्रीतून सुटका होणार, प्रकरण वाढवायचं की मिटवायचे याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती?

नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे.

नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे.

नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे.

मुंबई, 24 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery)  यांच्या कानाखाली लावण्याची भाषा वापरणे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane arrested)यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी राणेंना अटक केली आहे. पण, आता महाविकास आघाडी सरकारची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीने (ncp) राणेंचा विषय आता जास्त ताणू नये, असा विचार मांडला आहे. याबद्दल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहे.

नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थितीत आहे. या बैठकीत नारायण राणे यांना रात्री जामीन मिळावा, आता हे प्रकरण आणखी वाढू, असा सूर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी लगावला आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेला मुख्यमंत्री प्रतिसाद देतील. वादावर पडदा पडेल, अशी चिन्ह आहे. राणे यांना जामीन मिळाला असला तरी प्रकृतीच्या कारणामुळे राणे पुढचा दौरा करणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप ही बैठक सुरू आहे, त्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल.

दरम्यान, राणेंनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. पण, जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे पोलिसांनी राणेंना अटकेची प्रक्रिया सुरू केली. पण, दुसरीकडे राणेंनी हायकोर्टाचे दार ठोठावले. दुपारी हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली.

Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात तेजी, खरेदीआधी तपासा आजचा सोन्याचा भाव

पण, आता नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज हायकोर्टात याचिका फाईल होणार नाही. तांत्रिक अडचणींमुळे आज याचिका दाखल होऊ शकणार नाही.  उद्या सकाळी याबद्दल याचिका दाखल होईल.  कारण,  गुन्हे दाखल केल्याचे ओरीजनल डॉक्युमेंट शिवाय न्यायालयाने याचिका दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे.

तसंच, फौजदारी गुन्हे असल्याने राणे यांना उद्या कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. दुसरीकडे राणे यांनी आधीपासूनच अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे, त्यामुळे त्याची सुनावणी मुंबईत होईल. तर, आता अलिबागचे एसपी आणि IG महाडला आल्यावर एक बैठक होणार आहे.

First published:
top videos