Home /News /mumbai /

BREAKING : ठाकरे सरकार असेही मेहरबान, राजभवनाने अधिक खर्च केले 18 कोटी!

BREAKING : ठाकरे सरकार असेही मेहरबान, राजभवनाने अधिक खर्च केले 18 कोटी!


अनिल गलगली यांस सामान्य प्रशासन विभागाने अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तिकेत अंतर्भूत मागील 5 वर्षाची माहिती उपलब्ध करुन दिली आहे.

अनिल गलगली यांस सामान्य प्रशासन विभागाने अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तिकेत अंतर्भूत मागील 5 वर्षाची माहिती उपलब्ध करुन दिली आहे.

अनिल गलगली यांस सामान्य प्रशासन विभागाने अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तिकेत अंतर्भूत मागील 5 वर्षाची माहिती उपलब्ध करुन दिली आहे.

    मुंबई, 16 मे : महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांच्यामध्ये वाद अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. पण, दुसरीकडे आता राजभवनाच्या (raj bhavan mumbai) खर्चात कोट्यवधीची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. राजभवनाच्या खर्चात तब्बल 18 कोटींची वाढ झाली आहे.  राज्यात महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आल्यानंतर राज्यपाल कार्यालयावर उदारता दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे. एकीकडे राज्यपाल आणि राज्य शासनामध्ये संघर्ष सुरू असताना दुसरीकडे राज्य शासन राजभवनाच्या मागणीवर प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात धनराशी वितरित करत आहे. मागील 2 वर्षात 60 कोटींहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना  राज्य सरकारने दिली आहे. वर्ष 2019 च्या तुलनेत मागील 2 वर्षात राजभवनाच्या खर्चात 18 कोटींची वाढ झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे राजभवन कार्यालयास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती मागितली होती. (काश्मिरी पंडितांना वाचवायचे असेल तर.. माजी मुख्यमंत्र्यांची सरकारकडे अजब मागणी) अनिल गलगली यांस सामान्य प्रशासन विभागाने अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तिकेत अंतर्भूत मागील 5 वर्षाची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. वर्ष 2017-18 मध्ये 13, 97, 23, 000 इतक्या रक्कमेची तरतुद करण्यात आली होती. राजभवन कार्यालयाने 12,49,72,000 लाख खर्च केले. वर्ष 2018-19 मध्ये एकूण तरतुद 15,84,56,000 रक्कम होती तर 13,71,77,000 इतकी रक्कम खर्च करण्यात आली. वर्ष 2019-20 मध्ये तरतूद रक्कम 19,86,62,000 असताना अधिक रक्कम 19,92,86,000 वितरित करण्यात आली ज्यापैकी 17,63,60,000 रक्कम खर्च करण्यात आली. तर वर्ष 2020-21 मध्ये तरतुद रक्कम 29,68,19,000 होती पण प्रत्यक्षात 29,50,92,000 इतकी रक्कम वितरित करण्यात आली आणि त्यापैकी 25,92,36,000 रक्कम खर्च झाली. वर्ष 2021-22 मध्ये तरतुद रक्कम 31,23,66,000 असताना शासनाने 31,38,66,000 रक्कम प्रत्यक्षात वितरित केली. ज्यापैकी राज्यपाल कार्यालयाने 27,38,56,000 इतकी रक्कम खर्च केली. तर मागील 2 वर्षात 60,89,58,000 इतकी रक्कम वितरित करण्यात आली ज्यापैकी 53,30,92,000 रक्कम खर्च करण्यात आली. जवळपास 18 कोटींची अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. (मराठी कलाकाराने अशा पोस्ट करणं लज्जास्पद' मानसी नाईक केतकी चितळेवर भडकली) राजभवन कार्यालयाने वाढीव खर्चाबाबत माहिती सार्वजनिक करण्यात यावी आणि सर्व खर्चाचे ऑडिट करत त्यास संकेतस्थळावर अपलोड करावी, अशी मागणी  अनिल गलगली यांनी केली आहे. याबद्दलचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या