• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING NEWS : अखेर राज्यात बारावीची परीक्षा रद्द, ठाकरे सरकारची मोठी घोषणा

BREAKING NEWS : अखेर राज्यात बारावीची परीक्षा रद्द, ठाकरे सरकारची मोठी घोषणा

राज्य सरकारने दहावीपाठोपाठ आता बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई, 03 जून : राज्यात कोरोनाची (Corona Virus) तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. आधीच  सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12 वीची परीक्षा केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ आता महाविकास आघाडी सरकारने सुद्धा राज्यात 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर बारावीच्या परीक्षा घेण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अखेर, राज्य सरकारने दहावीपाठोपाठ आता बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  नाथाभाऊंचा विषय आहे, पण हे माझंही घर! फडणवीस भेटीवर रक्षा खडसेंचं स्पष्टीकरण

  आपत्कालीन विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत 12वीची परीक्षा रद्द करण्याबाबात चर्चा झाली आणि प्रस्ताव मंजूर केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. अशी घोषणा केली. त्याचबरोबर, राज्याच पाच टप्प्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. ५ टक्के पॉझिटीवेहीटी रेट आणि  ऑक्सिजन २५ टक्के बेड आत ज्या जिल्ह्यात आहे तिथे लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाणे वेळेचे बंधन नाही, लोकल सुरू करू असंही त्यांनी जाहीर केलं.  CBSE बारावीची परीक्षा रद्द दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बोर्ड परीक्षांबाबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत  सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12वीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातील कोरोनामुळे झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी 12 वीच्या परीक्षा होणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून भारत सरकारने बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले.
  Published by:sachin Salve
  First published: