मुंबई, 09 सप्टेंबर : अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारने नकार दिला होता. पण सुप्रीम कोर्टाने परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दिल्यामुळे अखेर परीक्षांचे वेळापत्रक आता तयार झाले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयाच्या परीक्षाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
सर्व महाविद्यालयात ऑनलाइन परीक्षा होणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून या परीक्षा घेण्यास आदेश काढण्यात आले आहे. काही अतिदुर्गम भागात सर्व ऑनलाइन परीक्षा होणार आहे. याबद्दल अधिकृत घोषणा दुपारी 1 वाजता राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. पण, 1 ऑक्टोबरपासून परीक्षा होणार हे आता निश्चित झाले आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकारने घोषणा केली होती. तर यूजीसीने परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. पण कोर्टाने परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यामुळे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला.
परीक्षेचं असं असणार नियोजन
15 ते 30 सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक घेण्यात यावे. प्रात्यक्षिके हे ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन (जिथे जे शक्य असेल ते) असा दोन्ही पद्धतीनं घेण्यात येणार आहे. परीक्षेचा टाईमटेबल 7 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांनी कळवावा, परीक्षा कमितकमी एक तास अथवा 50 मार्कची परीक्षा असेल. 30 ऑक्टोबरपर्यंत निकाल लागावा, असं अहवालात म्हटलं आहे. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.