BREAKING : मुंबईत उद्यापासून कडक निर्बंध, लोकल प्रवासाला येणार मर्यादा

BREAKING : मुंबईत उद्यापासून कडक निर्बंध, लोकल प्रवासाला येणार मर्यादा

मॉल, थेटर पूर्णपणे बंद करणार आहोत, खाजगी ऑफिसेस 2 शीफ्टमध्ये चालवण्यावर भर देण्याचे आमचे आवाहन आहे.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरले आहे. राज्याची राजधानी मुंबईत (Mumbai) शुक्रवारपासून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या लोकलमध्ये (Mumbai Local) पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा म्हणून कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिली.

किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यामुळे कडक निर्बंध लावले जाणार आहे. धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद करण्याचे संकेत पेडणेकर यांनी दिला.

शरद पवारांच्या नावाने ओळखली जाणार 'सह्याद्री'तील वनस्पती, Argyreia Sharadchandra

तसंच, हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थितीने चालवले जाणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईची लोकलमधून पुन्हा एकदा फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहितीही पेडणेकर यांनी दिली.

मॉल, थेटर पूर्णपणे बंद करणार आहोत, खाजगी ऑफिसेस 2 शीफ्टमध्ये चालवण्यावर भर देण्याचे आमचे आवाहन आहे. दुकानं आणि बाजारपेठा एक दिवस आड सुरू ठेवले जातील, असे संकेतही महापौरांनी दिले आहे.

HSC exam news: बारावीच्या Hall Ticket बाबत बोर्डाचा निर्णय; कसं मिळेल ऑनलाइन?

मुंबईमधील रुग्णालयांमध्ये बेड्स किती उपलब्ध आहेत, याबद्दल सुद्धा पेडणेकर यांनी माहिती दिली.  मुंबईत सध्या 16561 एकूण बेड आहेत. त्यापैकी 12628 बेड भरले आहेत तर 3933 रिकामे आहेत.

मुंबईत 1627 icu बेड आहेत त्यापैकी 1303 वापरात आहेत तर 324 बेड शिल्लक आहेत. शहरात 8914 एकूण ऑक्सिजन बेड आहेत. त्यापैकी सहा हजार 695 बेड वापरात तर 2219 रिकामे आहेत.

मुंबई व्हेंटीलेटर 1000 आहेत त्यापैकी 830 व्हेंटिलेटर बेड वापरात तर 170 रिकामे आहेत. शहरात सोळा हजार बेडची क्षमता वाढवून 25000 यावर नेण्यात येणार आहे, असंही महापौरांनी सांगितले.

Published by: sachin Salve
First published: April 1, 2021, 5:56 PM IST

ताज्या बातम्या