• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING : शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

BREAKING : शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

जर कुणी प्लॅन ए आणि प्लॅन बी केला असेल त्या सगळ्यांना मी सांगतो आमच्याकडे प्लॅन प्लस आहे'

 • Share this:
  मुंबई, 28 जून : 'महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) अजिबात संभ्रमावस्था नाही. अत्यंत सुरळीत सरळसोट आणि योग्य मार्गाने पुढे निघालेली आहे. सरकार पाच वर्षाचा कार्यक्रम पूर्ण करेल. बाहेर उगाचच संभ्रम पसरवले जातात ते कोण पसरवत आहे हे चांगलं माहिती आहे. पण अशा प्रकारच्या अफवा आणि भ्रम निर्माण करून या सरकारचा बाल बाका होणार नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)यांच्या भेटीनंतर दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांच्यासोबत 2 दिवस बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना राऊत यांनी भेटीबद्दल खुलासा केला. 'संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत पक्षाचे नेते आहेत आणि खासदार आहेत त्यामुळे काही कारणास्तव आम्ही भेटलो त्यात आश्चर्य काय? सरकार अस्थिर होईल या भ्रमात कोणी राहू नये. मीडियाच्या माध्यमातून भ्रम निर्माण केले जात आहेत म्हणून वारंवार सांगावे लागते कारण तुम्हाला आता कृतीतूनच दिसेल की सरकार किती गंभीर आहे. बैठक ही चौकशीसाठी वगैरे नसते. शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक आहेत, शरद पवार यांनी तेच सांगितल आहे आणि उद्धव ठाकरे यांनीही तेच सांगितलं आहे, असंही राऊत म्हणाले. टीव्ही अभिनेत्याची ऑनलाईन फसवणूक; दारुचं आमिष दाखवत हजारोंचा गंडा 'आमच्यात संशयास्पद वातावरण नाही भ्रम आहे. दिल्लीच्या बैठक यांचा इथे परिणाम होत नाही. महाविकास आघाडी सरकार स्वबळावरच आले आहे आणि राजकीय पक्ष स्वबळावर आले आहेत. इतर पक्षांमध्ये बैठका होत नाहीत का? पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यात काय एवढे आश्चर्य काय? या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये, मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. मुख्यमंत्री नव्हते तेव्हा मी रोजच भेटत होतो, आता ते मुख्यमंत्री आहेत. आम्ही रोज भेटतो, रोज फोनवर बोलतो चर्चा करतो, असंही राऊत म्हणाले. 'सूत्र जागी झाली असतील तर त्यांना जागं राहू द्या त्यांना झोपेची गोळी कधी द्यायची ते आम्ही पाहू. जर कुणी प्लॅन ए आणि प्लॅन बी केला असेल त्या सगळ्यांना मी सांगतो आमच्याकडे प्लॅन प्लस आहे' असा टोलाही राऊत यांनी लगावला. IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजचा टीम इंडियाला कोणताच फायदा नाही, कारण... 'प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रकरणात त्रास दिला जात आहे यासंदर्भात बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब आणि मी उपस्थित होतो. जर आमचा आमदार अडचणीत आला असेल आणि त्याला विनाकारण त्रास देत असतील तर काय मार्ग काढावा हे पाहावे लागेल. पक्ष पूर्णपणे प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी आहे आणि राहणार, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं. संवाद माझ्याशी आहे आमदाराशी संवाद ठेवू नये का सगळ्या आमदारांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद आहे. प्रताप सरनाईक आणि माझी चर्चा झालेली आहे. आत्ताचा मिनिटापूर्वी मी त्यांच्याशी बोललो, ते शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेतच राहणार आहे, असंही राऊत म्हणाले.
  Published by:sachin Salve
  First published: