Home /News /mumbai /

BREAKING : दहिसरमध्ये SBI बँकेत दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात कर्मचाऱ्याचा मृत्यू

BREAKING : दहिसरमध्ये SBI बँकेत दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात कर्मचाऱ्याचा मृत्यू

दहिसर पश्चिममध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दुपारी ३.३० वाजेच्या सुमारासही घटना घडली.

    मुंबई, 29 डिसेंबर : मुंबईतील (mumbai) दहिसर (dahisar) परिसरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेमध्ये (sbi bank robbery) दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दोन हल्लेखोरांनी बँकेत गोळीबार केला आहे. या हल्ल्यात बँकेच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दहिसर पश्चिममध्ये ही घटना घडली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दुपारी ३.३० वाजेच्या सुमारासही घटना घडली. दोन दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून आत प्रवेश केला. त्यानंतर पैसे लुटण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला. त्याचवेळी पिस्तुल घेवून दोन तरुण अचानक बॅंकेत शिरले. बॅंकेत शिरताच पिस्तूल असलेल्या तरुणाने एका बॅंक कर्मचाऱ्यावर गोळी झाडली आणि कॅशिअरकडे जावून त्याच्याकडे असेलली रोख रक्कम मागितली. ती जवळपास २ लाख ६० हजार रुपये होती असं प्राथिमिक तपासात समोर आले आहे. गोळीबारात एका बॅंक कर्मचारीचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा बॅंक कर्मचारी दरोडेखोरांच्या हल्यात गंभीर जखमी आहे. बॅंकेत गोळीबार करुन कॅशिअरकडून २ लाख ६० हजार रुपये घेवून हे दरोडेखोर तात्काळ बॅंकेबाहेर पळाले आणि जवळच त्यांनी उभी केलेली मोटर सायकल घेवून दोघे दरोडोखोर फरार झाले.घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलीस बँकेत दाखल झाले आहे. बँकेची पाहणी करण्यात आली. तसंच मुंबईमध्ये ठीकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. डोंबिवलीत बँक कर्मचाऱ्याला लुटणारी टोळीला अटक तर दुसरीकडे, सुरा, कोयता, विळा, नॉन चाकु, स्कु ड्रायव्हर, इलेक्ट्रीक पक्कड या सारख्या विविध हत्याराच्या सहाय्याने बँक कर्मचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. आशु दुमडा, कुणाल बोध ,विशाल जेठा,सलमान पुहाल, गणेश लोट अशी या अटक या लुटारूंची नावे आहेत.ठाकुर्ली समांतर रस्त्यावर बँक कर्मचाऱ्याला लुटण्याचा प्रकार २५ डिसेंबरच्या मध्यरात्री घडला होता. यावेळी पाच जणांच्या टोळीने धारधार तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्याला लुटले होते.या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर रामनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने पाचही आरोपींना अटक केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या