BREAKING : अखेर प्रदीप शर्मा यांना NIA ने केली अटक, पोलीस दलात खळबळ

सखोल चौकशी नंतर दुपारी प्रदीप शर्मांना अटक करण्यात आली असल्याचं सांगण्यात आले आहे.

सखोल चौकशी नंतर दुपारी प्रदीप शर्मांना अटक करण्यात आली असल्याचं सांगण्यात आले आहे.

  • Share this:
    मुंबई, 17 जून :  मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) मृत्यूप्रकरणी एनआयएच्या रडारवर असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना अखेर अटक करण्यात आली आहे.  आज सकाळी प्रदीप शर्मांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर मुंबईत आणले असता अटक करण्यात आली आहे. प्रदीप शर्माच्या अटकेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरी छापे टाकले होते. सकाळी 6.30 च्या सुमारास शर्मा यांच्या अंधेरीतील घरी ही कारवाई करण्यात आले. प्रदीप शर्मा यांना एनआयएनं लोणावळ्यातून ताब्यात घेतलं होतं आणि त्यांची चौकशी सुरू होती अखेर चौकशी अंती दुपारी प्रदीप शर्मांना अटक करण्यात आली असल्याचं सांगण्यात आले आहे. चिंताजनक! महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा अधिक धोका मनसुख हिरेन आणि कार मायकल रोड प्रकरणी प्रदीप शर्मा यांची चौकशी झाली होती. पण, एनआयएच्या ते कायम रडारवर होते. दोन दिवसांपूर्वीच NIA ने संतोष आणि आनंद या दोघांना अटक केली होती.एकाला लातूरमधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून काही नवीन खुलासे झाले आहेत. त्यानंतर एनआयएच्या कारवाईला वेग आला आणि त्यानंतर प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. 'नवीन आयटी कायद्यांचं पालन करण्यात ट्विटर अपयशी, कायदेशीर संरक्षण' संपुष्टात विशेष म्हणजे, याआधी कारमायल रोडवर स्फोटकांनी कार ठेवल्याप्रकरणी CIU युनिटचे  माजी प्रमुख सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एपीआय रियाज काझी, सुनिल माने, हवालदार विनायक शिंदे, बुकी नरेश गोर, संतोष शैलार, आनंद जाधव यांना अटक केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published: