मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : अखेर धारावीत Omicron चा शिरकाव, मौलवीचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह!

BREAKING : अखेर धारावीत Omicron चा शिरकाव, मौलवीचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह!

 ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.

ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.

ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 10 डिसेंबर : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन मुंबईत (Coronavirus Omicron Variant)  हातपाय पसरत आहे. मुंबईची सर्वात गजबजलेली झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये (Dharavi Mumbai) अखेर ओमायक्रॉनने (Omicron patient in dharavi)  शिरकाव केला आहे. परदेशातून आलेल्या एका मौलवीचा रिपोर्ट हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.

डोंबिवलीमधील आढळलेला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण निगेटिव्ह आढळल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला होता. पण आता परदेशातून मुंबईतील धारावीत  आलेल्या एका नागरिकाचा कोविड रिपॉर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला असून ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

बिग बींच्या Duplex Flat मध्ये राहणार 'ही' अभिनेत्री, देणार इतकं लाख भाडं

पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेली व्यक्ती ही मौलवी आहे. मुंबई आल्यानंतर ते धारावी येथील एका मशिदीत वास्तव्यास होते. सुरुवातील या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. तो अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे.

बीस साल बाद! ऑस्ट्रेलियाच्या मानगुटीवर इडन गार्डनचं भूत, द्रविड-लक्ष्मणनंतर आता

त्यामुळे ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. या मौलवीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या मौलावीला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे,

पुण्यातील पहिला ओमायक्रॉन बाधित रुग्ण कोरोनामुक्त

दरम्यान, डोंबिवलीतील ओमायक्रॉन बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर आता पुण्यातीलही एक ओमायक्रॉन रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. निश्चितच या बातमीमुळे पुणेकरांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा दिलासा मिळाला आहे.  हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर या काळात फिनलँड येथे गेला होता. त्यानंतर तो पुण्यात परतला होता. 29 नोव्हेंबर रोजी त्याचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोणतीही लक्षणं नसल्यामुळे तो संस्थात्मक क्वॉरनटाईनमध्ये होता. 10 दिवसानंतर त्याची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी खबरदारी म्हणून पुढील 7 दिवस त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

First published: