मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : नवनीत राणांना मोठा झटका, हायकोर्टाकडून जात प्रमाणपत्र रद्द

BREAKING : नवनीत राणांना मोठा झटका, हायकोर्टाकडून जात प्रमाणपत्र रद्द

जातप्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी...

मुंबई, 08 जून: अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana caste certificate canceled) यांना मुंबई हायकोर्टाने (High Court mumbai) चांगलाच धक्का दिला आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हायकोर्टाने हे प्रमाणपत्र रद्द केले आहे. तसंच, नवनीत राणांना हायकोर्टाकडून 2 लाखांचा दंड ठोठावला आहे.

खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ (anandrao adsul) यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल आज दिनांक 8 जून रोजी घोषीत करण्यात आला.

महात्मा गांधींच्या पणतीला 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, 62 लाखाच्या फसवणुकीचा आरोप

उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंड ठोठावला आहे. तसंच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अॅड.सी.एम्.कोरडे, अॅड.प्रमोद पाटील व अॅड.सचिन थोरात यांनी बाजू मांडली.

स्टार्टर सुरू करताच मोटारीने घेतला पेट; सांगलीत भाजीविक्रेत्याचा होरपळून मृत्यू

जातप्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

First published:

Tags: नवनीत राणा