शिखा धारिवाल
मुंबई, 11 नोव्हेंबर : जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना मुंबईत रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त आहे. लतादीदींना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त आहे. लता मंगेशकरांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीविषयी बोलताना काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे. छातीमध्ये झालेल्या संसर्गाने लता मंगेशकर ICU मध्ये होत्या असं समजतं. रुग्णालयाने त्यांच्याबद्दल अजून कोणतीही माहिती अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही.
लता मंगेशकर 90 वर्षांच्या आहेत. पहाटेच त्यांना रुग्णालयात नेल्याचं समजतं. कुटुंबीयांनी News18 Lokmat ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती गंभीर नाही. स्थिर आहे. तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातल्या डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहेत
Team of Lata Mangeshkar: Lata Mangeshkar had chest infection so she was taken to Breach Candy Hospital, Mumbai today. She is now back at her home and is recovering. (file pic) pic.twitter.com/pYzmZHkthz
Loading...— ANI (@ANI) November 11, 2019
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, लता मंगेशकर यांना आता घरी सोडण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं ट्वीट ANI ने केलं आहे.
(ही बातमी अपडेट होत आहे.)
------------------------
संजय राऊतांना लीलावती रुग्णालयात दाखल करतानाचा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा