• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING : जळगावात भाजपला पुन्हा खिंडार, 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

BREAKING : जळगावात भाजपला पुन्हा खिंडार, 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील (Muktainagar municipality ) 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील (Muktainagar municipality ) 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील (Muktainagar municipality ) 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 • Share this:
  जळगाव, 24 सप्टेंबर : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे स्थानिक निवडणुकांचा (local election) राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जळगावमध्ये (jalgaon) भाजपला (bjp) पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. मुक्ताईनगर  आणि बोधवड नगरपालिकेतील (Muktainagar municipality ) 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे (eknath khadse) समर्थक भाजपचे 11 नगरसेवक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. सेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील सुद्धा यावेळी उपस्थितीत होते. उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधून प्रवेश दिला आहे. Explainer : डेंग्यू म्हणजे काय?, कसा होतो प्रसार, काय आहेत लक्षणे आणि उपचार? मुक्ताई नगर आणि बोधवड नगरपालिकाचे भाजप नगरसेवक हातावर शिवबंधन बांधले आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर अनेक भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. पण, खडसेंचे समर्थक असलेले नगरसेवकच आता शिवसेनेत दाखल होत असल्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहे. निम्मं धड गायब, पण अवघ्या 4.78 सेकंदात अचानक बदललं या तरुणाचं आयुष्य; पाहा Video काही महिन्यांपूर्वीच जळगावमध्ये  शिवसेनेनं भाजपला मोठा दणका दिला होता. जळगाव महापालिका (Jalgaon municipal corporation)  महापौर निवडणुकीत भाजपचे 27 नगरसेवक (BJP Corporator) सेनेत खेचून आणले होते. त्यामुळे जळगाव महापालिकेत सेनेचा भगवा फडकला होता. विशेष म्हणजे, जळगाव महापालिकेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत्य विश्वासू सहकारी आणि राज्य भाजपचे संकटमोचक हनुमान म्हणून ज्यांची ओळख आहे, असे गिरीष महाजन यांच्यावर होती. पण  महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपचे बहुमत संख्याबळ शिवसेनेनं राजकीय सर्जिकल स्ट्राईक करत उद्धवस्त केले होते.
  Published by:sachin Salve
  First published: