Home /News /mumbai /

BREAKING : पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत, पंचनाम्यानंतर मोठ्या पॅकेजची घोषणा

BREAKING : पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत, पंचनाम्यानंतर मोठ्या पॅकेजची घोषणा

अजूनही अनेक गावं पाण्याखाली आहे. त्या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे.

  मुंबई, 28 जुलै : कोकण (kokan flo0d), पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना (flood victims) तातडीने 10 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अनेक भाग हे अजूनही पाण्याखाली आहे. त्यामुळे पंचनामा करून विशेष पॅकेजची घोषणा केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (ekanath shinde) यांनी दिली. सर्व पंचनामे झाले तर अंदाजे 5 हजार कोटींपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पूरग्रस्तांना तातडीने मदत दिली पाहिजे, अशी चर्चा झाली. त्यामुळे पूरग्रस्तांना तातडीने मदत म्हणून प्रत्येकांच्या खात्यात 10 हजार रुपये रोख मदत दिली जाणार आहे. अजूनही अनेक गावं पाण्याखाली आहे. त्या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. त्या भागाची पाहणी केली जात आहे. या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर विशेष पॅकेजचा निर्णय घेतला जाईल, असंही शिंदे यांनी सांगितलं.

  ठाकरे सरकारचा खासगी शाळांना दणका, 15 टक्के फी कपात!

  सोबतच महापालिका आणि नगर परिषदेमध्ये जे कर्मचारी कोरोना काळात काम करत असताना मृत पावले आहे. त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तातडीची मदत म्हणून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील निकषांप्रमाणे बाधितांना मदत सुरू करण्यात आली असून या संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळासमोर मदत व पुनर्वसन विभागाने सादरीकरण केले.

  Shocking! गुदद्वारातून त्याने शरीरात सोडला मासा; पोटात जाताच झाली भयंकर अवस्था

  पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरू असल्याने पुढील पंधरा दिवसांत वाढीव मदतीबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणावा, असे यावेळी ठरले. सध्या बाधित कुटुंबांना त्यांच्या घरातील साहित्य, कपडे, भांडी यांच्या नुकसानीसाठी एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे तत्काळ मदत करणे सुरु आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. दरम्यान, मंगळवारीच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी कोकण सांगली (sangli flood), सातारा आणि कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे लोकांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावर पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये खात्यात आणि 5 हजारांची धान्याची मदत केली जाणार असल्याची माहिती  दिली होती.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या