Home /News /mumbai /

शिवसेनेनं आखली रणनीती! ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा, उद्धव ठाकरेंचे आदेश

शिवसेनेनं आखली रणनीती! ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा, उद्धव ठाकरेंचे आदेश

ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी जोमानं कामाला लागा

मुंबई, 19 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व शिवसेना (Shiv Sena) संपर्क प्रमुखांची बैठक संपली. राज्यात होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत (Gram Panchayat) या बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरा, सर्व ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. हेही वाचा...महापौर-उपमहापौरांच्या खुर्चीवरून शिवसेना आणि रिपाइंत जुंपली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केलं. ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी जोमानं कामाला लागा, गावागावात जनहिताची कामे करून जनतेची विश्वास संपादन करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. राज्यातील 34 जिल्ह्यातील 14 हजार 234 ग्राम पंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. यासाठी मुंबईत झालेल्या शिवसेना संपर्क प्रमुखांच्या बैठकीत रणनीती आखण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचयातीत शिवसेनेनं त्यांच्या संपर्क प्रमुखांना रणनिती आखुन सतर्क केलं आहे. शिवसेना राज्यातील सर्व ग्राम पंचायत निवडणुका लढणार आहे. यासंदर्भात रणनिती ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 15 जानेवारी 2021 रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. दरम्यान, कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात लांबलेल्या निवडणुका आता पुन्हा घेण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र, राज्य सरकारनं एक महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम होणार आहे. हेही वाचा...राज्यात काँग्रेस सत्तेकरता लाचार, सोनियांची झाली दिशाभूल; विखे पाटलांचा घणाघात सरपंचपदाची आरक्षण सोडत ही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पूर्ण केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत 8 जिल्ह्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. पण, आता राज्य सरकारने आरक्षण सोडत निर्णयाबद्दल केल्यामुळे सरपंच निवडीचा निर्णयही रद्द झाला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाची सोडत ही आधी होत असते. पण यात घोडेबाजार होणार, खोटी जातप्रमाणपत्र दाखवण्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे या गोष्टींना आळा घालण्यासाठी जानेवारी महिन्यात सोडत काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या