BREAKING NEWS: राज्यपालांनी स्वत:कडेच ठेवली विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी!

मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या 12 जणांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती.

मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या 12 जणांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती.

 • Share this:
  मुंबई, 15 जून: गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा (MLAs appointed by Governor) मुद्या प्रलंबित असल्यामुळे महाविकास आघाडी (MVA Government) आणि राज्यपालांमध्ये वाद पेटलेला आहे. मध्यंतरी यादी गहाळ झाल्याची माहिती समोर(RTI) आली होती. पण, ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांच्याकडेच असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या 12 जणांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. ती यादी  माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली होती. आज 15 जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर झालेल्या सुनावणीत ती यादी राज्यपालाने स्वतःकडे ठेवली असल्याचे सांगण्यात आले. आता राज्यपालांने निर्णय घेतल्यावरच माहिती मिळेल, असं सांगण्यात आले आहे. कोरोना लस घ्या आणि 10 लाखांची कार मोफत मिळवा; याठिकाणी मिळतेय अनोखी ऑफर त्यामुळे राज्यपालांनी गेल्या 8 महिन्यांपासून राज्य सरकारने पाठवलेल्या यादीवर कोणताच निर्णय घेतला नसल्याचे समोर आले आहे. काय घडलं होतं नेमकं? आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी माहिती विचारली होती की, 'मुख्यमंत्री महोदय/ मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेली यादी देण्यात यावी.

  गलवान चकमकीला एक वर्ष पूर्ण; वर्षभरात चीनशी दोन हात करण्यास भारत हरप्रकारे सज्ज

  तसंच मुख्यमंत्री महोदय/ मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. अनिल गलगली यांच्या अर्जावर 19 मे 2021 रोजी राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी उत्तर देत कळविले की, 'राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जन माहिती अधिकारी ( प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने, आपणांस उपलब्ध करुन देता येत नाही, असं स्पष्ट केलं होतं.
  Published by:sachin Salve
  First published: