• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING : ठरलं, काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

BREAKING : ठरलं, काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब


विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचं नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव...

विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचं नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव...

विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचं नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव...

 • Share this:
  मुंबई, 20 सप्टेंबर : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (Rajya Sabha by polls) घोषित झाली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव  (Rajeev Satav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अखेर उमेदवार ठरला आहे. रजनी पाटील (rajni patil) यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केला आहे. राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (Rajya Sabha by polls) घोषित केली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस (Congress) पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अखेर या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. रजनी पाटील यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केलं आहे. तसे पत्रकच काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.  याआधी काँग्रेसकडून मुकूल वासनिक, प्रज्ञा सातव, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा होती.  मात्र अखेरील रजनी पाटील यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचं नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तर, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, आता राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने त्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भातही चर्चा झाली.  प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर उमेदवारी न देता कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून 2024 च्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी. त्यामुळे आता  रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे प्रज्ञा सातव यांची आमदारकी निश्चित मानली जात आहे. राज्यसभेसाठी पोटनिवडणूक महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे. एकूण सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील एका जागेचा, पश्चिम बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील दोन रिक्त जागांचा समावेश आहे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच दिवशी निकाल सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे.
  Published by:sachin Salve
  First published: