मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : 'यावं लागतंय', अनिल देशमुखांसह पत्नी आणि मुलाला ED कडून समन्स, हजर राहा अन्यथा...

BREAKING : 'यावं लागतंय', अनिल देशमुखांसह पत्नी आणि मुलाला ED कडून समन्स, हजर राहा अन्यथा...

सलग दुसऱ्या दिवशी Anil Deshmukh यांच्या मालमत्तांवर Income Tax ची धाड

सलग दुसऱ्या दिवशी Anil Deshmukh यांच्या मालमत्तांवर Income Tax ची धाड

मात्र, देशमुख कुटुंबीय अजूनीही नॉट रिचेबल आहे. त्यामुळे सोमवारी अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला हजर राहणार की नाही

मुंबई, 30 जुलै : 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मागे लागलेला सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीचा (ED) ससेमिरा अजूनही कायम आहे. ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावला आहे. तसंच, त्यांचा - मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावला आहे.

ईडीकडून अटक टाळण्यासाठी अनिल देशमुख या कोर्टातून दुसऱ्या कोर्टात धावाधाव करत आहे. तर दुसरीकडे ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. पुढील आठवड्यात सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मेरीकोमच्या पराभवावर वाद, मॅचच्या 1 मिनीटआधी काय झालं? धक्कादायक खुलासा

एवढंच नाहीतर अनिल देशमुख यांचा मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावलं असून चौकशीला हजर न राहिल्यास ईडी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, देशमुख कुटुंबीय अजूनीही नॉट रिचेबल आहे. त्यामुळे सोमवारी अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला हजर राहणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.

अनिल देशमुखांविरोधात CBI चा तपास वेगानं

दरम्यान, अनिल देशमुखांविरोधातल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (Central Beureu of Investigation) सर्वांत मोठी छापेमारी (Raids) मोहिम राबवली आहे. अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआय (CBI) मार्फत करण्यात आली आहे.

नाशिकमधील छापखान्यातून 5 लाख गायब कसे झाले? पाहा ऐतिहासिक Photos

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्यात 12 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं. त्यासोबतच यासह सीबीआयनंही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले. राज्यातील मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), नाशिक, (Nashik), सांगली (Sangli) आणि अहमदनगर येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी छापे टाकत सर्च ऑपरेशन राबवलं.

First published:
top videos

    Tags: Anil deshmukh