Home /News /mumbai /

BREAKING : मुंबईमध्ये पहिली ते 9 वीपर्यंतच्या शाळा बंद, पुन्हा वर्ग भरणार ऑनलाइन!

BREAKING : मुंबईमध्ये पहिली ते 9 वीपर्यंतच्या शाळा बंद, पुन्हा वर्ग भरणार ऑनलाइन!

मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे मुंबईमधील सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय

मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे मुंबईमधील सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय

मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे मुंबईमधील सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय

    मुंबई, 03 जानेवारी : राज्यात कोरोनाबाधित (corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये (mumbai corona update) सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या हद्दीत 10 वी व 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष बंद ठेऊन ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. (Schools from 1st to 9th class closed in Mumbai) कोरोनाची लाट ओसरल्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण, मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे मुंबईमधील सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत देशामध्ये व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमायक्रॉनया कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या आणि या शहरात जगभरातून  लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा (ओमायक्रॉन) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. 1 ली ते इ. 9 वी व 11 वी ) असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ते  31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत. (ऑस्ट्रेलियन Accent मुळे तरुणावर फिदा झाली युवती; बॉयफ्रेंडची केली फसवणूक) इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी या वर्गातील विद्याथ्याने प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू राहणार आहे. (ज्या घरात केली चोरी तेथेच New Year Party, स्वयंपाकघर पाहून घरमालक हादरला!) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थ्याचे नियोजनानुसार, लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरु राहणार आहे. याकरीता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करून घेण्यासाठी शाळेत बोलवता येईल.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: School

    पुढील बातम्या