मुंबई, 25 सप्टेंबर : भिवंडी शहरातील बांधकाम व्यावसायिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठाणे गुन्हे आणि खंडणी विरोधी पथकाने पंजाब आणि नाशिक नंबरच्या 30 गाड्यामध्ये येऊन रात्री समदनगर येथील बंगल्यावर सापळा रचून एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांना सव्वा लाख रुपयांच्या खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडलं.
या कारवाईमध्ये आरोपी खालिद गुड्डू व त्याचे भाऊ इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया, फैज आलम, गुलाम खान या चौघांना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. या बाबत भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 364 अ, 386, 387, 34 arms act 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा-मोठी बातमी! राष्ट्रवादीतून MIM मध्ये गेलेल्या नेत्याच्या बंगल्यावर छापा
भिवंडी शहरातील समदनगर येथील एमआयएम शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या बंगल्यावर मध्यरात्री छापा टाकण्यात आला होता. यावेळी स्थानिक पोलिसांना बाहेर ठेवण्यात आले होते. या छाप्यासाठी तब्बल 30 ते 35 पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. इतक्या मोठा गदारोळ होत असल्याचे पाहून येथे मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले होते. या छाप्यात खालिद गुड्डू यांच्या लहान भावासह सात जणांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोण आहे खालिद गुड्डू?
खालिद गुड्डू हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असून ते अगोदर राष्ट्रवादीमध्ये शहराध्यक्ष होते. त्यानंतर सध्या ते एमआयएम मध्ये शहरराध्यक्ष असून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यासाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसीच्या भिवंडीत सभा झाल्या होत्या. त्याचप्रमाणे ते माजी नगरसेवक आहेत. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून काही निकाली निघाले आहेत. 10 वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला दिल्ली पोलिसांनी अशाच पध्द्तीने अटक केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.