• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING : मुंबई ड्रग्ज प्रकरणाला नवे वळण, सुनील पाटील पोलीस स्टेशनमध्ये हजर!

BREAKING : मुंबई ड्रग्ज प्रकरणाला नवे वळण, सुनील पाटील पोलीस स्टेशनमध्ये हजर!

भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुनीलवर सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती...

भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुनीलवर सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती...

भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुनीलवर सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती...

 • Share this:
  मुंबई, 07 नोव्हेंबर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise drug party case) आरोप-प्रत्यारोप प्रकरणानंतर आता हालचालींना वेग आला आहे. भाजपचे नेते मोहित भारतीय (BJP Mohit Bhartiya) यांनी सुनील पाटील (Sunil Patil) याचा उल्लेख केला होता. अखेर सुनील पाटील मुंबई पोलीस स्टेशनला दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पाटील  उर्फ सुनील भटू चौधरी आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.  भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटीलवर सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.  याच प्रकरणात सुनील पाटील तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  परमबीर सिंगांना भाजपनेच गायब केलं, शेवटचं लोकेशन गुजरातमध्ये -नाना पटोले

  वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या केबिनमध्ये सुनील पाटील याने भेट घेतली. त्यानंतर सुनील पाटील याला मुंबई पोलीस एका जीपमधून झोन एकला घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. याच ऑफिसमध्ये SIT चे ऑफिस आहे, त्यामुळे या प्रकरणी आणखी नवीन माहिती समोर येण्याची चिन्ह आहे. दरम्यान, भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या संदर्भात फोटो, ऑडिओ क्लिप दाखवत गंभीर आरोप केला. या सर्व प्रकरणात सुनील पाटील नावाचा व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित भारतीय यांनी केला. 'ठुमक्या'मधून वेळ मिळाला तर बीडकडे बघा, विनायक मेटेंचा धनंजय मुंडेंना टोला आर्यन खानला दोन तारखेला अटक झाली आणि 3 तारखेला त्याला रिमांड मिळाला. त्यानंतर 6 तारखेला पत्रकार परिषद घेऊन एका मंत्र्याने भाजप, एनसीबीवर आरोप केले. या सर्वांच्या मागची कहाणी मी पुराव्यांसह सादर करत आहे. या सर्व गोष्टींचा मास्टरमाईंड सुनील पाटील आहे. हा सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे, असा दावाही मोहित भारतीय यांनी केला होता.
  Published by:sachin Salve
  First published: