#BREAKING : क्रिस्टल इमारत आग प्रकरणी बिल्डराला अटक

#BREAKING : क्रिस्टल इमारत आग प्रकरणी बिल्डराला अटक

परळमधल्या टोलेजंग क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत 4 रहिवाशांचा मृत्यू झालाय तर जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

  • Share this:

मुंबई, 22 आॅगस्ट : परळमध्ये आग लागलेल्या क्रिस्टल टॉवर आग प्रकरणी बिल्डर अब्दुल रझाक  इस्माईल सुपारीवालाला अटक करण्यात आलीये. त्याच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत 4 रहिवाशांचा मृत्यू झाला, आणि अनेक जण जखमी झाले. बेपर्वा बिल्डर आणि बेजबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का नको असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर संध्याकाळी बिल्डरवर गुन्हा दाखल झाला होता.

परळमधल्या टोलेजंग क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत 4 रहिवाशांचा मृत्यू झालाय तर जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. आगीचं थेट कारण जरी समोर आलं नसलं तरी बेपर्वा बिल्डरनं पेटवलेल्या ठिणगीला महपालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी फुंकर मारली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला.

मुंबईतल्या परळमधल्या क्रिस्टल टॉवरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी रहिवाशांना 7 कोटी रूपये मोजावे लागतात.मात्र त्या 7 कोटींच्या मोबदल्यात बिल्डरनं घर नाही तर मृत्यूचा आशियाना विकला होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

विकासक इस्माईल हाजी इसा यांनी उभारलेल्या, क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्याला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झालाय. ज्यात 3 पुरूष आणि एका वयस्कर महिलेचा समावेश आहे. तर जखमी झालेल्यांचा आकडा वीसच्या घरात आहे. मात्र यासंपूर्ण प्रकरणाची व्याप्ती फक्त आगीच्या दुर्घटनेपुरती मर्यादीत नाही आहे.

बिल्डरांची  'हम करे सो कायदा' ही वृत्ती आणि दुर्घटना होईपर्यंत झोपेचं सोंग घेणारं प्रशासन या दोन्ही बाबी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.

ओसी म्हणजेच भोगवाटा प्रमाणपत्र मिळालं नसतानाही बिल्डरांनी फ्लॅटचा ताबा दिल्याची गंभीर बाब उघड झालीय.महापालिकेनं वारंवार नोटीसा बजावूनही बिल्डरनं त्याकडे कानाडोळा केला. क्रिस्टल टॉवर आगीच्या दुर्घटनेनं अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

5 वर्षांपासून बिल्डरनं ओसी (भोगवाटा प्रमाणपत्र) का मिळवलं नाही?

महापालिकेची कारवाई फक्त नोटीसपुरतीच मर्यादीत का राहिली?

ओसीशिवाय इमारतीला वीज आणि पाण्याचं कनेक्शन कसं मिळालं?

इमारतीमधली अग्निशमन यंत्रणा कार्यन्वित का नव्हती?

बिल्डरवर आणि महापालिका अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये ?

याआधी देखील मुंबईनं मोठ्या आगीच्या दुर्घटनेचे चटके सोसलेत. त्या झळींमध्ये निष्पाप मुंबईकरांनी प्राण गमावले आहेत. मात्र अशा प्रकरणातील दोषी बिल्डर आणि महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही.. अशा प्रकारच्या आगीच्या दुर्घटना भविष्यात आणखी किती मुंबईकरांच्या आयुष्याची रांगरांगोळी करणार आहे? या प्रश्न तुर्तास तरी अनुत्तरीतच आहे.

VIDEO : 'आधी खूप भीती वाटली,पण हिंमत केली'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 11:20 PM IST

ताज्या बातम्या