मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : लॉकडाऊनचे निर्बंध होणार आणखी कडक, जे सुरू आहे ते होईल बंद?

BREAKING : लॉकडाऊनचे निर्बंध होणार आणखी कडक, जे सुरू आहे ते होईल बंद?


राज्यात लॉकडाऊन 2.0 लागू केल्यानंतर लोकांनी थट्टा मस्करी करत नियम पायदळी तुडवत आहे.

राज्यात लॉकडाऊन 2.0 लागू केल्यानंतर लोकांनी थट्टा मस्करी करत नियम पायदळी तुडवत आहे.

राज्यात लॉकडाऊन 2.0 लागू केल्यानंतर लोकांनी थट्टा मस्करी करत नियम पायदळी तुडवत आहे.

मुंबई, 15 एप्रिल : राज्यात कोरोनाची (maharashtra corona cases) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्य सरकारकडून 15 दिवसांचा लॉकडाऊन (maharashtra lockdown) लागू करण्यात आला आहे. पण, अजूनही लोकं लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात लॉकडाऊन 2.0 लागू केल्यानंतर लोकांनी थट्टा मस्करी करत नियम पायदळी तुडवत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकं नियमांचं उल्लंघन करून गर्दी करत आहेत.

युजर्सना तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न; Instagram, Facebook वर लवकरच नवं फीचर

त्यामुळे आता जीवनावश्यक गोष्टीवर निर्बंध येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. कोविड 19 संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणखी कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये ज्या अटी शिथिल करण्यात आल्या आहे, त्या बंद करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

दरम्यान, कोविड संसर्ग हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावा तसेच लॉकडाऊनच्या काळात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना प्रति प्रौढ व्यक्ती दररोज 100 रुपये आणि मुलांना प्रत्येकी 60 रुपये दररोज असे सानुग्रह अर्थसहाय करण्यास राज्य सरकारला परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

सोनू सूदचा निर्धार; गरीब रुग्णांसाठी बांधतोय नवं हॉस्पिटल

एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी)  मधील केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ता देखील लगेच मिळावा जेणे करून कोविड मुकाबल्यात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत मदत होईल, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

अनेक लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घेतली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांची ओढाताण होते आहे. निर्बंधांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण देखील पडत आहे. हे पाहता चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत त्यांच्याकडून हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

First published:

Tags: Lockdown