• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING : फरार किरण गोसावी अखेर आला समोर, पोलिसांसमोर करणार आत्मसमर्पण!

BREAKING : फरार किरण गोसावी अखेर आला समोर, पोलिसांसमोर करणार आत्मसमर्पण!

माझ्या जीवाला धोका आहे, 3 तारखेनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर राजकारण सुरू आहे, असंही किरण गोसावी म्हणाला.

माझ्या जीवाला धोका आहे, 3 तारखेनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर राजकारण सुरू आहे, असंही किरण गोसावी म्हणाला.

माझ्या जीवाला धोका आहे, 3 तारखेनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर राजकारण सुरू आहे, असंही किरण गोसावी म्हणाला.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : आर्यन खान अटक (aryan Khan arrest case) प्रकरणाला आता नवनवीन वळण मिळाले आहे. पंच प्रभाकर साईलने केलेल्या गौप्यस्फोटानंतर अखेर फरार असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) प्रकट झाला आहे. CNN news18 शी बोलत असताना किरण गोसावीने आपण पोलिसांना शरण mumbai police () येणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच त्याने खंडणी घेतल्याचे आरोपही फेटाळून लावले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या किरण गोसावीचा अखेर ठावठिकाणा लागला आहे. CNN news18 शी संवाद साधून किरण गोसावी याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. किरण गोसावी याने आपण पोलिसांना शरण येणार असल्याचं सांगितलं आहे. लोकांच्या चिता जळल्या म्हणून 100 कोटी लशीचा उत्सव का? नाना पटोलेंचा थेट सवाल त्याचबरोबर प्रभाकर साईल याने 25 कोटींच्या खंडणीचे केले आरोप हे निराधार आहे. मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेटलो नाही, त्यामुळे अशी कोणतीही खंडणी मागितली नव्हती, असा दावाही त्याने केला. मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीला माहिती दिली होती. त्यानंतर क्रुझवर कारवाई करण्यात आली होती. आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला होता, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता तर तो क्रुझवर काढला होता, असा दावाही गोसावी याने केला आहे. Jio दिवाळीआधी देणार मोठं गिफ्ट; लाँच होणार जगातील सर्वात स्वस्त Smartphone तसंच, माझ्या जीवाला धोका आहे,  3 तारखेनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर राजकारण सुरू आहे, असंही किरण गोसावी म्हणाला. दरम्यान,  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साहिल यांनी सोमवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या सहआयुक्तांची भेट घेतली आहे. तसंच त्यांनी कोर्टात एका प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यामध्ये त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केले आहेत. तसंच समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
  Published by:sachin Salve
  First published: