मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : 'त्या' दिवशी पुन्हा लॉकडाऊन लागेल, राजेश टोपेंचा कडक इशारा

BREAKING : 'त्या' दिवशी पुन्हा लॉकडाऊन लागेल, राजेश टोपेंचा कडक इशारा

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

आज कोरोनाची लाट ओसरली असली तरी तज्ज्ञांकडून ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्या लाटेची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोनाबाधित (corona Patient) रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे राज्यात अनेक निर्बंध हे शिथिल करण्यात आले आहे. दुकानं, हॉटेल्स, मॉल्स सुरू करण्यात परवानगी दिली आहे. पण, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट (The third wave of corona) येण्याची भीती व्यक्त केली जात आहे, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल, त्या दिवशी लॉकडाऊन पुन्हा लागेल, असा कडक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिला.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात अनेक निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना राजेश टोपे यांनी माहिती दिली.

आज कोरोनाची लाट ओसरली असली तरी तज्ज्ञांकडून ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्या लाटेची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा विचार करता २०० मेट्रिक टन ऑक्सीजन वाढवणार आहे.  १४१ ऑक्सीजन प्लांटना मान्यता दिली आहे. ३८०० मेट्रीक टन ऑक्सीजन लागू शकतो, तिसऱ्या लाटेत ७०० मेट्रीक टन ऑक्सीजन ज्यावेळी लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लागेल, असा इशाराही टोपेंनी दिला.

सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी, खरेदी करण्याआधी इथे तपासा प्रति तोळा सोन्याचा भाव

मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरं सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता धार्मिक स्थळं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. धार्मिक स्थळे बंद राहणार पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे. त्याच बरोबर,

सिनेमागृह , नाट्यगृह सुद्धा बंद राहणार आहे, असंही टोपेंनी सांगितलं.

तसंच, लोकल ट्रेन २ डोस झालेल्यांना प्रवास करायला मान्यता दिले आहे. मासिक आणि त्रिमासिक पास असेल, बळजबरीने प्रवास केला तर ५०० रू दंड भरावा लागणार आहे.

सर्व दुकाने १० वाजेपर्यंत सुरू असण्याची परवानगी देण्यात आली आहे. उपहार गृहांना ५०% आसनावर मान्यता देण्यात आली आहे. उपहारगृहात जे लोक वेटिंगमध्ये असतील त्यांना मास्क घालणे अनिवार्य, वेटर आणि कर्मचारी यांनी दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. ५० % क्षमतेनं लोकांना उपहार गृहात प्रवेश दिला जाणार आहे, असंही टोपेंनी सांगितलं.

मराठमोळा शृंगार!'आई कुठे..करते' फेम अश्विनीचा पारंपरिक अंदाज; PHOTO होतायत VIRAL

सर्व कार्यालयांमध्ये शासकीय आणि निमशासकीय यांना लस देण्याचे प्राधान्य देणार आहे. तसंच, २४ तास खाजगी कार्यालये सुरू राहू शकतील हा निर्णय घेण्यात आला आहे. इनडोअर स्पोर्टस सुरू असतील त्याला मान्यता देण्यात आली आहे, असंही टोपेंनी सांगितलं.

'शॉपिंग मॉल १० पर्यंत सुरू असणार मात्र दुसरा डोस घेणे अनिवार्य, दुसरा डोस झालेल्यांनाच प्रवेश दिला जाईल' असंही टोपे म्हणाले.

'शाळा आणि कॉलेजच्या बाबतीत शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स बाबात मुख्यमंत्र्यांची बैठक आहे त्यानंतर अंतिम निर्णय येईल. कुलगुरू यांच्याकडून अहवाल घेतल्यानंतर कॉलेजच्या बाबतीत निर्णय असेल. शाळा कॉलेज सुरू करण्याबाबत बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल', असंही टोपेंनी सांगितलं.

First published: