मुंबई, 01 डिसेंबर : शिवसेनेचे (shivsena) नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant ) यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. ताफ्यातील सुरक्षारक्षकाची एक गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर येऊन आदळली. सुदैवाने या अपघातात उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु, एक सुरक्षारक्षक जखमी झाली आहे. (Uday Samant car accident in mumbai )
मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांच्या गाडीला मुंबईत रात्री ८ वाजेच्या सुमारास अपघात झाला आहे. एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात झाला. ताफ्यातील एक स्पेशल सिक्युरिटी युनिटच्या गाडीचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे ही गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर जाऊन आदळली.
कोरोनामुळे मृतांच्या वारसांना मिळणार 50 हजार रुपये, 'या' वेबसाईटवर करा अर्ज
अपघात झाला तेव्हा गाडीत उदय सामंत हे एकटेच होते. सुदैवाने या अपघातात यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते एकदम सुखरूप आहे. परंतु, एक सुरक्षारक्षकाला दुखापत झाली आहे. या सुरक्षारक्षकाला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. या अपघातात जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचा औषधोपचाराचा खर्च उदय सामंत करणार आहे, अशी माहिती सामंत यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ताफ्यातील गाडीचे अचानक ब्रेक कसे झाले आणि अपघात नेमका का घडला याचा तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.