• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : अखेर आरोग्य विभागाची परीक्षा रद्द, हॉल तिकीटाच्या गोंधळामुळे मोठा निर्णय

BREAKING : अखेर आरोग्य विभागाची परीक्षा रद्द, हॉल तिकीटाच्या गोंधळामुळे मोठा निर्णय

अखेर राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अखेर राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अखेर राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:
पुणे, 24 सप्टेंबर : कुणाच्या वडिलांचे नाव चुकीचे तर कुणाला थेट उत्तर प्रदेशमध्ये परीक्षा केंद्र मिळाल्याचा प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेत (Maharashtra Health Department) उघड झाला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. अखेर राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (maharashtra Health department exam finally canceled ) आरोग्य विभागातील  पद भरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी परीक्षा  (Health Department Recruitment 2021) आयोजित करण्यात आली होती. पण हॉल तिकिटात संबंधित एजन्सीने प्रचंड गोंधळ घातल्याचं समोर आलं होतं. हॉल तिकीटमध्ये अनेक चुका समोर आल्या होत्या. नवरीबाई जोमात नवरदेव कोमात! स्वतःच्याच लग्नात घातला धिंगाणा; VIDEO VIRAL त्यामुळे अखेर आरोग्य विभागाकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पुढील परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील 6200 पदांसाठी परीक्षा होणार होती. राज्यभरात जवळपास 8 लाख उमेदवार परीक्षा  देणार होते. या परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध झाले होते. यात अक्षय राऊत या उमेदवाराने वाशिम परीक्षा सेंट निवडलेले असताना त्याच्या हॉल तिकिटावर चक्क उत्तर प्रदेशातील नोएडा हे परीक्षा केंदाचा (Exam Centre) पत्ता छापून आला होता. त्यामुळे मी काय उत्तर प्रदेशात जाऊन पेपर देऊ का? असा उद्विग्न सवाल या परीक्षार्थीने आरोग्य विभागाला विचारला होता. VIDEO - कार पार्किंगसाठी सॉलिड जुगाड! भन्नाट Idea पाहून तुम्हीही चक्रावून जाल एवढंच नाहीतर अनेक परीक्षांर्थींचे हॉल तिकिटच डाऊनलोड होत नाही, तर काहींमध्ये प्रचंड चुका आहेत. तर एका उमेदवाराला चक्क उत्तर प्रदेश नोएडा मधील सेंटर आले होते. काही मुलांचे लिंगाबाबत चुकीची माहिती दिली होती. काहींच्या हॉल तिकिटावर फक्त कॉलेजच नाव आहे. जिल्ह्याचा पत्ताच नाही. अशा उमेदवारांनी सेंटरवर जायचं तरी कसं ? याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी या गोंधळात लक्ष घालावे अशी मागणी परीक्षार्थी करत होते. 'न्यासा' या खासगी एजन्सीला या भरतीचे कंत्राट दिल्याची माहिती समोर आली आहे.
Published by:sachin Salve
First published: