ठाणे, 22 जानेवारी : ठाण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेटमधील तुलिप कंपनीला ( fire at Tulip Diagnostics company) आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये आगीच्या ज्वाळा भडकताना दिसत आहेत. याबाबतची माहिती मिळताच 5 फायरब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Fire breaks out at Wagle Estate in Thane )
ठाण्यातील बायोसेल नावाच्या कंपनीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचं काम सुरू आहे. (Fire breaks out at Wagle Estate in Thane ) अद्याप येथून जीवित हानीबाबत कोणतेही वृत्त समोर आलेले नाही.
ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत pic.twitter.com/OhlYdSALRE
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.