BREAKING मुंबई लोकलमधून आता दिव्यांग आणि कर्करुग्णांचा प्रवासाची मुभा

BREAKING मुंबई लोकलमधून आता दिव्यांग आणि कर्करुग्णांचा प्रवासाची मुभा

अद्याप मुंबई लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या अद्याप आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर नागरिकांना अद्यापही लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांकडून लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीचा जोर वाढत आहे. त्यातत दिव्यांग आणि कर्करुग्णांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

त्यामुळे त्यांना आता मुंबईय उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करता येईल. लोकल सेवा बंद असल्याने कर्करुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता कर्करुग्णांचा त्रास कमी होणार आहे व त्यांना लोकलमधून उपचार करण्यासाठी जाता येणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही लोकल सुरू करण्यासाठी आंदोलन पुकारले होते. यावेळी काही नेत्यांनी लोकलमधून परवानगी नसताना प्रवास केला होता.

हे ही वाचा-'Coronavirus चं संकट वाढलं तर जगभरात 16 सेकंदाला जन्माला येईल मृत बालक'

दरम्यान राज्यातील कोरोनाची आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 358 जणांचा मृत्यू झाला असून 13,395 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल दिवसभरात 355 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.64 एवढा झाला आहे. बुधवारीही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त होतं. आज दिवसभरात 15575 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आलं असून आतापर्यंत 11,96,441 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 81.13 टक्के इतका आहे. त्यानंतर आज राज्यात 13,395 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 22,84,204 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 25,321 जण विविध संस्थांमध्ये क्वारंटाईन आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: October 8, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या