मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : घातक Omicron मुंबईच्या दारावर? दक्षिण आफ्रिकेवरून आलेला डोंबिवलीकर कोरोना पॉझिटिव्ह

BREAKING : घातक Omicron मुंबईच्या दारावर? दक्षिण आफ्रिकेवरून आलेला डोंबिवलीकर कोरोना पॉझिटिव्ह

दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.

मुंबई, 28 नोव्हेंबर : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (Omicron Variant)  दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील यंत्रणा अलर्ट झाली असून कोरोनाची नियमावली (corona rules) जाहीर केली आहे. पण, दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यांची ओमिक्रॉन चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेवरून काही प्रवासी मुंबईत दाखल झाले आहे. या प्रवाशांची तपासणी केली असता एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या प्रवाशी डोंबिवलीमध्ये राहणार आहे. खबरदारी म्हणून तातडीने या प्रवाशाची  ओमिक्रॉनची चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेकडून देण्यात आली आहे. या प्रवाशाला  क्वारंटाइन करण्यात आले आहे.

डेब्यू न करताच खेळलेल्या भरतची फिल्मी Love Story, 10 वर्षांच्या डेटिंगनंतर...

दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओ मायक्रोनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले सतर्क राहण्याचे निर्देश

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड विषयक बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या नव्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच, राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. 'आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता यार" असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो. त्यामुळे मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बजावलं.

जळगावात शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांच्या मुलाचा हळदीचा कार्यक्रम, पाहा PHOTO

नवा व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती.  त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

'महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे' असं मुख्यमंत्री म्हणाले.

First published: