Home /News /mumbai /

BREAKING : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

BREAKING : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

रजनी केणी यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनाही याबाबत पत्र पाठवलं आहे.

मुंबई, 19 ऑक्टोबर : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका रजनी केणी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पिठासीन अधिकारी म्हणून महापौर यांनी रजनी केणी यांचे मत अवैद्ध ठरवले होते. याच मुद्द्यावरून आता रजनी केणी या थेट पोलीस स्थानकापर्यंत पोहोचल्या आहेत. 'महापौरांनी माझं मत अवैध ठरवलं. तसंच मतदारांनी मतपत्रिका दाखवण्याचा आग्रह धरूनही मत पत्रिका दाखवली नाही. नंतर मात्र वृत्तपत्रात माझी सही अवैध ठरवण्यात आल्याची माहिती दिली,' असं केणी यांचं म्हणणं आहे. भाजप नगरसेविकेनं थेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रजनी केणी यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनाही याबाबत पत्र पाठवलं आहे. नक्की काय आहे प्रकरण? मुंबई महापालिकेत शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करत 12 प्रभाग समित्यांमध्ये विजय मिळवला आहे. गेल्यावेळी शिवसेनेकडे 8 प्रभाग समित्या होत्या, तर भाजपकडे 9 प्रभाग समित्या होत्या. या वर्षीच्या निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने 4 प्रभाग समित्या जास्त मिळवत एकूण 12 प्रभाग समित्यांवर आपला झेंडा रोवला आहे. मुख्य म्हणजे भाजपचे खासदार मनोज कोटक हे ज्या प्रभाग समितीचे सदस्य आहे, तिथल्या निवडणुकीत समसमान मते पडण्याची शक्यता होती. अशावेळी चिठ्ठीद्वारे प्रभाग समिती अध्यक्ष निवडला गेला असता. पण निवडणुकीत भाजपचे एक मत अवैध ठरवण्यात आले. यावर भाजपने आक्षेप घेतला. परंतु त्यांना मतपत्रिका दाखवण्यात आल्या नाही. त्यामुळे शिवसेनेने फसवणूक करून प्रभाग समिती जास्त मिळवली असा आक्षेप भाजपने घेतला आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: BJP, BMC, Mumbai, Mumbai police, Shivsena

पुढील बातम्या