Home /News /mumbai /

BREAKING : राम मंदिराच्या भूमिपूजनाला निमंत्रण? उद्धव ठाकरे अयोध्येत उपस्थित राहण्याची शक्यता

BREAKING : राम मंदिराच्या भूमिपूजनाला निमंत्रण? उद्धव ठाकरे अयोध्येत उपस्थित राहण्याची शक्यता

मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहाण्याची शक्यता आहे.

मुंबई, 20 जुलै : अयोध्येत श्री राम जन्मभूमीत निर्माण होणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी रामलल्ला मंदिर (Ram Mandir Ayodhya, ) निर्माणाचं भूमीपूजन होणार आहे. या वेळी देशभरातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याचं निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भूमीपूजन सोहळ्यास हजरे लावतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवारांनीही केली होती टीका कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोलापुरात दाखल झालेल्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. 'कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवी. मात्र काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल,' अशा शब्दांत शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. कसं असेल अयोध्येतील राम मंदिर? प्रस्तावित राम मंदिर हे 161 फुटांचं भव्य असून त्याला 5 डोम असणार आहेत. राम मंदिर परिसर आणि सर्व अयोध्येच्या विकासाचा नकाशा तयार केला जात आहे. तर देशातल्या सर्व नागरिकांचा या बांधकामात सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी या आधीच दिली होती. मंदिरासाठी पैसे कमी पडले नाहीत आणि पडणारही नाहीत असंही राय यांनी सांगितलं होतं.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ram Mandir, Ram mandir ayodhya, Uddhav thackeray

पुढील बातम्या