मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING NEWS: भाजपचं 'मिशन मुंबई', सर्व नगरसेवकांची बोलावली महत्त्वाची बैठक

BREAKING NEWS: भाजपचं 'मिशन मुंबई', सर्व नगरसेवकांची बोलावली महत्त्वाची बैठक


मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत भाजपचे तब्बल 82 जागा जिंकल्या होत्या.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत भाजपचे तब्बल 82 जागा जिंकल्या होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर राज्यात भाजपच्या गोटात हालचालींना वेग...

 मुंबई, 09 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे, भाजपकडून (BJP) बैठकांचे सत्र सुरूच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal corporation Election) निमित्ताने भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला सर्व भाजप नगरसेवकांना बोलावण्यात आले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेच्या तयारीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक भाजपच्या वसंतमृती या कार्यालयात पार पडत आहे. सकाळी 9 वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी मुंबई महापालिकेतील प्रमुख नगरसेवक आणि मुंबईतील आमदार उपस्थित राहणार आहेत.

कोरोनाला हरवून मुलगा घरी पोहोचला अन् प्रशासनाने फोन करून दिली निधनाची बातमी

तसंच, या बैठकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, आमदार आशीष शेलार, आमदार अतुल भातखळकर उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे, नवी दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत बैठक सुरू होती, तेव्हा राज्यात भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला होता. भाजपच्या कोअर समितीची बैठक पार पडली आहे.  या बैठकीला राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल.संतोष, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, संजय कुटे, पंकजा मुंडे, मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे हे बैठकीसाठी हजर होते. देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या सरकारी निवासस्थानी ही बैठक पार पडली होती.

Rain Updates: अत्यंत महत्वाचे, 'हे' दोन दिवस रायगडसाठी धोकादायक

या बैठकीनंतर फडणवीस यांनी  'मला आनंद आहे की किमान त्यांनी केंद्र सरकार बरोबर संवाद केला त्याचे आम्ही स्वागत करतो. मोदींचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या भेटी होत होत्या, असे संबंध असले पाहिजे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल' असं सूचक विधान केलं होतं.

First published:

Tags: BMC, Mumbai