Home /News /mumbai /

#BREAKING : महाराष्ट्रातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण

#BREAKING : महाराष्ट्रातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण

कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.

कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

    विनया देशपांडे, मुंबई, 24 मे : महाराष्ट्राभोवतीचा कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या सातत्याने वाढत चालली आहे. स्थिती असूनही नियंत्रणात असली तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत अशा सर्वच स्तरातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसत आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण (corona positive) झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र अशातच या जागतिक संकटात रस्त्यावर उतरून लढताना राजकीय नेत्यांनाही हा व्हायरस लक्ष्य करू लागला आहे. त्यातच एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्याचं कळतंय. दरम्यान, कोरोना रुग्णाची माहिती समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तीकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जाऊ शकतं, त्यामुळे सरकारने कोरोनाबाधितांची नावे जाहीर करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचं नावंही उघड करता येणार नाही. याआधीही एका मंत्र्याला झाला होता कोरोना संसर्ग राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती. आव्हाड यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि अत्यंत कठीण स्थिती त्यांनी कोरोनावर मात केली. कोरोनाला हरवल्यानंतर स्वत: आव्हाड यांनीच पुढे येत मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं होतं. मात्र तोपर्यंत त्यांचंही नाव कोरोनाबाधित म्हणून उघड करण्यात आलं नव्हतं. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या