Home /News /mumbai /

BREAKING : शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीबाबत अमित शहांची सूचक प्रतिक्रिया

BREAKING : शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीबाबत अमित शहांची सूचक प्रतिक्रिया

अमित शहांनी मोजक्याच शब्दांत उत्तर दिल्यामुळे ही भेट झाली असल्याचा एका प्रकारे दुजोरा मिळत आहे.

    मुंबई, 28 मार्च : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या अहमदाबाद येथील (Ahmadabad) गुप्त भेटीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते ही अफवा असल्याचे म्हणत आहे. तर दुसरीकडे खुद्द अमित शहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाही, असं म्हणून नवा खुलासा केला आहे. नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांना शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल विचारले असता अमित शहा म्हणाले की, 'प्रत्येक गोष्ट ही सार्वजनिक करता येत नाही' अमित शहांनी मोजक्याच शब्दांत उत्तर दिल्यामुळे ही भेट झाली असल्याचा एका प्रकारे दुजोरा मिळत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Navab Malik) यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबाद येथून एकत्र आले होते. पण, ते कुणालाही भेटले नाही. गुजरातच्या एका दैनिकाने हे खोडसाळ वृत्त दिले आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. ही बातमी निव्वळ अफवा आहे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली. कुठे झाली गुप्त बैठक? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शरद पवार यांची भेट अहमदाबादमध्ये झाली. शरद पवार हे राजस्थानमधील जयपूरमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. त्याच्या एकदिवसाआधी ते अहमदाबादला आले होते. तेव्हा ही बैठक झाल्याचे वृत्त आहे. शरद पवार हे एका खासगी विमानाने अहमदाबादला पोहोचले होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह एका उद्योगपतीच्या गेस्ट हाऊसवर ही भेट झाली. VIDEO: फिल्मफेअर अवॉर्ड न मिळाल्याने सोनाक्षी निराश; जुगाड करत घरी आणला पुरस्कार गुजरातमध्ये राजकीय बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने या बैठकीला मोठे महत्त्वप्राप्त झाले होते. तसंच या भेटीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; या वाहनांवर आकारला जाणार Green Tax विशेष म्हणजे, राज्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले आहे. त्यातच मुंबईत स्फोटकांनी कार सापडल्याप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए करत आहे. तर खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या होत्या. त्यामुळे अशी काही भेट झाली आहे का, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ahmedabad, Amit Shah, NCP, Sharad pawar, अमित शहा, शरद पवार

    पुढील बातम्या