Home /News /mumbai /

BREAKING : मुंबईत 3 मजली इमारत कोसळली, 2-3 जण अडकल्याची भीती

BREAKING : मुंबईत 3 मजली इमारत कोसळली, 2-3 जण अडकल्याची भीती

मालाडच्या मालवणी परिसरात आज रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

    मुंबई, 25 जानेवारी : मुंबईतील (Mumbai) मालाड परिसरात एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाराखाली तीन जण अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान पोहोचले आहे. मदतकार्य सुरू आहे. दक्षिण मुंबईमध्ये इमारतीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज दुसऱ्या दिवशी एक तीन मजली इमारत कोसळली आहे. मालाडच्या मालवणी परिसरात आज रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. एक तीन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीच्या ढिगाराखाली 2-3 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे. स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. ढिगार उपासण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईमध्ये मुंबईतील ताडदेव परिसरात इमारतीला भीषण (Mumbai building fire) आग लागली होती. ताडदेव परिसरात असलेल्या कमला या इमारतीला ही आग (Kamala Building fire) लागली होती. ही रहिवाशी इमारत असून  इमारतीच्या 18व्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला होता.  राज्य सरकारने मृत्यांचा वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या