Break the chain : खासगी वाहनांना प्रवास करण्यापूर्वी काढावा लागेल ई-पास; कशी कराल नोंदणी?

Break the chain : खासगी वाहनांना प्रवास करण्यापूर्वी काढावा लागेल ई-पास; कशी कराल नोंदणी?

ज्यांना जिल्ह्याबाहेर किंवा शहराबाहेर प्रवास करावयाचा असल्यास त्यांना ई-पास आवश्यक असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : Covid - 19 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 21 एप्रिल रोजी जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार आतंरजिल्हा प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. 22 एप्रिलपासून मुंबई पोलीस आयुक्तांनी खाजगी वाहनांना मुक्त संचार करण्यास बंदी घातली आहे. मात्र ज्यांना जिल्ह्याबाहेर किंवा शहराबाहेर प्रवास करावयाचा असल्यास त्यांना ई-पास आवश्यक असणार आहे.

त्यासाठी https//covid19.mhpolice.in या डोमेनवर आवश्यक ती कागदपत्रं जोडून अर्ज केल्यास अर्जदाराला नमूद केलेल्या वैध कारणासाठी ई-पास देण्यात येणार आहे. अत्यावश्यक, शासकीय आणि वैद्यकीय सेवेशी संबंधित व्यक्तींना कार्यलयीन कामकाजाच्या प्रवासासाठी ई-पास आवश्यक नसून त्यांना ओळखपत्राच्या आधारे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबईत प्रवासासाठी अत्यावश्यक आणि शासनाने सूट दिलेल्या कारणांसाठी ई-पासची गरज नाही.

हे ही वाचा-व्हेंटिलेटरवर आहे म्हणून काय झालं? पुण्यातील Covid ICU मध्ये बासरीचे सुमधूर सूर!

पंतप्रधानांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजन यांच्या तुटवड्याचा (Shortage of Oxygen and Remdesivir) विषय  हे विषय मांडले. राज्याला न्याय्य हक्कानं हे दोन्ही मिळावं यासाठी आग्रही भूमिका ठाकरेंनी घेतल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

Published by: Meenal Gangurde
First published: April 23, 2021, 7:59 PM IST

ताज्या बातम्या