मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ब्रेन डेड झालेल्या महिलेनं दिलं दोघांना जीवदान; अवघ्या 83 मिनिटांत पुण्यातून मुंबईत पोहोचवलं मानवी हृदय

ब्रेन डेड झालेल्या महिलेनं दिलं दोघांना जीवदान; अवघ्या 83 मिनिटांत पुण्यातून मुंबईत पोहोचवलं मानवी हृदय

उच्च रक्तदाबाची ही समस्या तशी खूप साधी आहे आणि योग्य उपचारांनी सहज बरी होऊ शकते. पण, जर योग्यवेळी उपचार करुन नियंत्रण मिळवलं नाही तर, त्याचे धोकादायक परिणाम देखील होऊ शकतात. यामुळे, स्ट्रोक, हृदय आणि मूत्रपिंडाशी संबंधित रोगांचा धोका असतो.

उच्च रक्तदाबाची ही समस्या तशी खूप साधी आहे आणि योग्य उपचारांनी सहज बरी होऊ शकते. पण, जर योग्यवेळी उपचार करुन नियंत्रण मिळवलं नाही तर, त्याचे धोकादायक परिणाम देखील होऊ शकतात. यामुळे, स्ट्रोक, हृदय आणि मूत्रपिंडाशी संबंधित रोगांचा धोका असतो.

एरवी पुण्यातून नवी मुंबईला पोहोचण्यासाठी किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागतो. पण ग्रीन कॉरिडॉरच्या साह्याने अवघ्या 83 मिनिटांत पुण्याहून नवी मुंबईला मानवी हृदय पोहोचवण्यात आलं आहे.

नवी मुंबई, 18 जुलै: एरवी पुण्यातून नवी मुंबईला पोहोचण्यासाठी किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागतो. पण ग्रीन कॉरिडॉरच्या साह्याने अवघ्या 83 मिनिटांत पुण्याहून नवी मुंबईला मानवी हृदय पोहोचवण्यात आलं आहे. यामुळे बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला नवजीवन मिळालं आहे. संबंधित रुग्णावर दीड तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करत मानवी हृदयाचं प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. पण वेळेवर मानवी हृदय पुण्याहून मुंबईला पोहोचवल्यामुळे संबंधित रुग्णाचा जीव वाचला आहे.

खरंतर, मुंबईतील रहिवासी असणाऱ्या 29 वर्षीय रवी शर्मन अहिरवार या तरुणावर बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला हृदय प्रत्यारोपणाची तातडीची गरज होती. पण मानवी हृदय दान करणारा व्यक्ती मिळत नव्हता. दरम्यान पुण्यातील बुधवारी पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात एका महिलेला 'ब्रेन डेड' घोषित करण्यात आलं होतं. यामुळे संबंधित महिलेचे हृदय आणि यकृत दान करण्यात आलं होतं.

हेही वाचा-कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट! संसर्गजन्य Monkeypox चा रुग्ण आढळल्यानं खळबळ

पुण्यातील अन्य एका रुग्णामध्ये महिलेच्या यकृताचं प्रत्यारोपण करण्यात आलं. तर बेलापूर याठिकाणी उपचार घेणाऱ्या रवी अहिरवार या तरुणाला मानवी हृदयाची आवश्यकता असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पुण्यातील महिलेचं हृदय लवकरात लवकर नवी मुंबईला पोहोचवणं गरजेचं बनलं. पण पुण्यातील जहाँगिर रुग्णालयापासून बेलापूर येथील अपोलो रुग्णालयापर्यंतचा प्रवास किमान तीन ते चार तासांचा होता. यामुळे पुण्यातील हृदय बेलापूरला पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला.

हेही वाचा-कोरोनातून बरं झालेल्यांना गंभीर आजारांचा धोका; TB टेस्ट गरजेची : आरोग्य मंत्रालय

यानंतर गुरुवारी अवघ्या 83 मिनिटांत पुण्यातून बेलापूर याठिकाणी मानवी हृदय पोहोचवण्यात आलं आहे. याठिकाणी अपोलो रुग्णालयात रवी अहिरवार यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तब्बल दीड चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर रवी अहिरवार यांना नवजीवन मिळालं आहे. पण आरोग्य कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत हृदय मुंबईत पोहोचवल्यानं हे शक्य झालं आहे. अनेकांनी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याचं कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Mumbai pune expressway