जलप्रलयाचे थैमान.. प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतले पूरग्रस्त 'ब्रह्मनाळ'

जलप्रलयाच्‍या थैमानामुळे पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. हजारो नागरिक यामुळे बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झाली आहेत

सागर कुलकर्णी सागर कुलकर्णी | News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 07:23 PM IST

जलप्रलयाचे थैमान.. प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतले पूरग्रस्त 'ब्रह्मनाळ'

मुंबई, 14 ऑगस्ट - जलप्रलयाच्‍या थैमानामुळे पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. हजारो नागरिक यामुळे बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र सरसावला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील पूरग्रस्त ब्रह्मनाळ हे गाव दत्तक घेतले आहे. ब्रह्मनाळमधील गावकरी पुरातून सुटका करण्यासाठी बोटीने जात असताना ही बोट उलटली होती. या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. ब्रह्मनाळ हे ग्रामपंचायतीच गाव असून गावात 700 कुटूंब राहतात.

प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या प्रस्तावानुसार, गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी करण्यात येईल. गावातील 700 कुटुंबांना एक महिना पुरेल एवढी राशन-धान्याची व्यवस्था करण्यात येईल. विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य दिले जाईल. वॉटर एटीएमची व्यवस्था करण्यात येईल. शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

'लालबागचा राजा' मदतीला आला धावून

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे कराव्या लागणाऱ्या पुनर्वसानासाठी 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.

4 दिवसांत साडेआठ कोटींचा निधी जमा

Loading...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून ओघ सुरू आहे. गेल्या 4 दिवसांत पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीत तब्बल साडेआठ कोटींचा निधी जमा झाला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त सहाय्यता समिती स्थापन करण्यात आली आहे.

नाना पाटेकरही दत्तक घेणार काही गावं

सांगली , सातारा आणि कोल्हापुरातल्या पुरात आता कोणीही अडकलं नसून 4 लाख 53 हजार लोकांना पुरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती कोल्हापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे . सांगली , सातारा आणि कोल्हापुरात विविध ठिकाणी 500 वर निवारा केंद्र उभारण्यात आली असल्याचे सांगत निवारा केंद्रात 3 लाखापेक्षा जास्त लोक आश्रय घेत आहे . गावच्या पुर्नवसानासाठी 6 ते 8 महिल्यांचा अवधी लागेल दरम्यान पंढरपूर देवस्थान समिती आणि अभिनेता आणि नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर काही गावं दत्तक घेणार असल्याच चंद्रकांत पाटील यांनी सांगितले .ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले.. चंद्रकांत पाटील

- राज्यात 4 लाख 53 हजार लोकांना पुरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढल

- पुरामुळे कोणी अडकले नाही,राज्यात 500 च्या वर निवार केंद्र

- निवारा केंद्रात 3 लाखापेक्षा जास्त लोक राहतात

- कोल्हापूर मध्ये 2 कोटी पोहचले,प्राथमिक 10 व 15 हजार मदत दिली.

- गावच पुनर्वसन सहा आठ महिने चालेल, जे दत्तक गाव घेतील. 5 पंढरपूर देवस्थान,2 नाना पाटेकर दत्तक घेतील.

- सांगली व कोल्हापूरमध्ये पुरस्थिती घरफोड्या,ट्रक लुटल्या जातयेत दुर्दैवी.लूट नाही पण गावाला आमच्या मदत द्या अस.संवेदनशीलतेंन पाहणं गरजेच.

- मदतीला सरकार मागेपुढे पाहणार नाही.सरकार स्वतःच्या तिजोरीतून खर्च करेल.

- 6800 कोटीमध्ये शेती नव्याने उभा करावं लागेल.त्या ठिकाणच्या शेतकर्यांचे कर्ज माफी साठी प्रयत्न सुरूय.शेतीपंपाची बिल माफ करणार

प्रविण परदेशी यांनी वर्षभर आपत्ती व्यवस्थापनाच ट्रेनिंग घेतलय ,ते तिथे असल्याने प्रक्रियेला वेग येईल

- दर आठवड्याला यावर बैठक होईल,मुख्यमंत्री स्वतः कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पूर्ण मदती साठी प्रयत्न.

- महाजनादेश स्थगित केलीय,राखीचा कार्यक्रम पुढे ढकललाय ...हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

(इनपूट-अद्वैत मेहता, पुणे)

असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2019 02:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...